Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीDates Benefits: रोज भिजवलेली खजूर रिकाम्या पोटी खा; होतील ‘हे’ फायदे

Dates Benefits: रोज भिजवलेली खजूर रिकाम्या पोटी खा; होतील ‘हे’ फायदे

खजुराची चव सर्वांनाच आवडत नाही पण खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत. विशेषत: हिवाळ्यामध्ये खजूर खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच पण हिमोग्लोबिनसुद्धा वाढते. हिवाळ्यात खजूर खावे असेही म्हटले जाते कारण त्यात लोह असते आणि त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. खजूर हे पौष्टिकतेने परिपूर्ण आहे. यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या सूक्ष्म पोषक तत्वांचा बऱ्याच प्रमाणात समावेश आहे, जे की हाडं आणि हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. जर हिवाळ्यामध्ये तुम्ही रिकाम्या पोटी भिजवलेले खजूर खाल्लात तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. कारण तुम्ही तंदरुस्त राहिलात नाही तर आजारी पडू शकता आणि आजारपण हे आरोग्यावर वाईट परिणाम करु शकते. त्यामुळेच हल्ली लोक खाण्यापासून ते व्यायामापर्यंत शरीराची काळजी घेताना दिसतात म्हणजेच ते यासंदर्भात लोक जागरुक झाले आहेत.

पचन सुधारण्यास मदत होते

जर तुम्ही रोज भिजवलेल्या खजूरचं रिकाम्या पोटी सेवन केलात तर तुमचा चयापचय दर वाढण्यास मदत होते. याशिवाय पचनक्रियाही सुधारते. यामुळे पचनक्रिया तर सुधारतेच पण पोटाशी संबंधित समस्याही दूर होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यास उपयुक्त

तुम्हाला वजन लवकरात-लवकर नियंत्रणात आणायचं असेल तर सकाळी नाश्त्यात खजूर खाऊ शकता. तुमच्या शरीराला झटपट ऊर्जा देण्यासोबतच कॅलरी बर्न करण्यातही खजूर उपयुक्त ठरते. तसेच त्यामुळे वजन लवकर कमी होते. खजूर शरीराला ऊर्जा देते जे तुम्हाला व्यायाम करण्यास खूप मदत करते.

शरीरात लोहाचे प्रमाण वाढते

भिजवलेल्या खजूरचं सेवन केल्याने शरीराला भरपूर लोह मिळते. त्यामुळे शरीरातील थकवा कमी होतो. त्याच वेळी, शरीरातील ऊर्जा कर्बोदकांमधे वेगाने वाढते. त्यामुळे नेहमी भिजवलेले खजूर खाण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात.

हृदयासाठी खजूर फायदेशीर

तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर खजूर तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. याच्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. त्यात हायपोलिपिडेमिक, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट्स, आणि अँटी-अपोप्टोटिक असतात जे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात.

रक्ताची कमतरता दूर करते

खजूर खाल्ल्याने शरीरात रक्ताची कमतरता होत नाही. खजूरमध्ये भरपूर लोह असते.

खजूर कसे खावे ?

मनुका प्रमाणे तुम्ही ताजे किंवा वाळलेले खजूर म्हणजेच खारीकचं सेवन करू शकता. अनेकाना खजूर भिजवून खाणेही आवडत.

सकाळी खजूर का खावेत?

खजूर सकाळी रिकामी पोटी खाल्ल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते, तर आतड्यातील जंत नष्ट होण्यास मदत होते. याशिवाय खजूर आपल्याला आवश्यक असणाऱ्या अवयवांची स्वच्छता करण्यासही मदत करतात. यकृत आणि हृदयाचे आरोग्य हे सुधारते. याशिवाय खजूरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेला आणि केसांना एक नैसर्गिक चमक देतात. एका अहवालानुसार, खजूर खाल्ल्याने प्रतिकार शक्ती वाढते.

 

 

 

 

 

 

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -