मुंबई : काही आठवड्यांपूर्वीच बदलापुरातील एका शाळेत तीन ते चार वर्षांच्या मुलींवर अत्याचार झाला होता, ज्यामुळे शाळेतील पालक आणि नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यावर पोलिसांनी आणि प्रशासनाने प्रतिक्रिया देखील दिली होती. ते प्रकरण ताजे असताना बदलापूर शहर पुन्हा एकदा अशांत झाले आहे. बदलापुरमध्ये एका जन्मदात्याने त्याच्या पोटच्या मुलीसोबतच थरारक कृत्य केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर पूर्व येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ५४ वर्षीय नराधम वडील वारंवार पीडित मुलीवर अत्याचार करत होता. तसेच तिला मारहाणदेखील करत होता. आठवडाभरापूर्वी नराधमाने पुन्हा तिच्यावर अत्याचार केला होता. मात्र त्या घटनेनंतर पीडित मुलगी घरातून पळून गेली. त्यानंतर सोमवारी तिने वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार केली असून पोलिसांनी नराधम वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, बदलापूर पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परंतु आरोपी फरार झाला असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.