Thursday, May 22, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेची माफी मागतो - अजित पवार

महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेची माफी मागतो - अजित पवार

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा २६ ऑगस्टला कोसळला होता. या घटनेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली आहे. या संबंधी मी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेती माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत आणि एक वर्षाच्या आत त्यांची मूर्ती कोसळणे आमच्या सर्वांसाठीच धक्का आहे.


अजित पवार यांनी लातूर जिल्ह्यात आपल्या जन सन्मान यात्रेदरम्यान एका सार्वजनिक बैठकीत अधिकारी असो वा कंत्राटदार, दोषींविरोधात कारवाई केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी ४ डिसेंबरला मूर्तीचे अनावरण केले होते. यानंतर केवळ ८ महिन्यांतच २६ ऑगस्टला मूर्ती कोसळली. या प्रकरणी मूर्ती निमिर्तीकरणाचे कंत्राटदारांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. एफआयआर लोक निर्माण विभागाच्या तक्रारीनंतर दाखल करण्यात आली आहे.


 


राजकोट किल्ल्यावर आज बुधवारी ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. साधारण दीड तास राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये धुमश्चक्री सुरू होती.


Comments
Add Comment