Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

सकाळच्या या ५ सवयींनी करा दिवसाची सुरूवात, शरीर राहिल ताजेतवाने

सकाळच्या या ५ सवयींनी करा दिवसाची सुरूवात, शरीर राहिल ताजेतवाने

मुंबई: आपला दिवस कसा जाईल हे आपली सकाळ कशी आहे यावरून ठरते. जर सकाळची सुरूवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. तुम्ही स्वत:च पाहिले असेल तर ज्या दिवशी तुमचा मूड ऑफ असेल तर दिवसही खराब जातो. जर दिवसाची सुरूवात आनंदी होत असेल तर तुमचा संपूर्ण दिवस चांगला जातो.

स्वत:ला हायड्रेट ठेवा

रात्री ७-८ तासांच्या झोपेनंतर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. यामुळे सकाळी उठून स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणे गरजेचे आहे. यामुळे बॉडी डिटॉक्स होते. सोबतच संपूर्ण दिवसभर एनर्जी होती.

एक्सरसाईज करा

शारिरीक आणि मानसिकरित्या दोन्ही रूपाने फिट राहण्यासाठी एक्सरसाईज गरजेची आहे. जर आपण सकाळी एक्सरसाईज, वॉक अथवा योगा करत असू तर संपूर्ण दिवसभर एनर्जेटिक राहता येते.

मेडिटेशन करा

सकाळी उठून ध्यान-धारणा करा. सकाळच्या वेळेस वातावरण शांत असते. यामुळे आपण सहज ध्यान-धारणा करू शकतो. मेडिटेशन केल्याने मन शांत होते.

देवाचे आभार माना

सकाळी उठून त्या गोष्टींसाठी देवाचे आभार माना जे तुमच्याकडेआहे. असे केल्याने आपल्याला चांगले वाटेल.

हेल्दी ब्रेकफास्ट

तज्ञांच्या मते सकाळची सुरूवात हेल्दी ब्रेकफास्टने करा. अनेक जण सकाळी उठून घाई-घाईत ब्रेकफास्ट करत नाहीत. नाश्ता न केल्याने मेटाबॉलिज्म खराब होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा