Wednesday, March 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजशरद पवारांनी आतापर्यंत किती देवळे बांधली?

शरद पवारांनी आतापर्यंत किती देवळे बांधली?

पुतळा घटनाप्रकरणी खासदार नारायण राणे यांचा सवाल

मुंबई : सिंधुदुर्गात घडलेली पुतळा घटना दुर्दैवी आहे, मंगळवारी मी दुपारी १२ वाजता घटनास्थळी जाणार आहे आणि दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे. मात्र, काल एक आमदार बांधकाम विभागाचे ऑफीस फोडण्यासाठी गेला. तो ऑफिस फोडण्यासाठी गेला ते ऑफीस बंद झाल्यावर आणि मिरवतो की मी निष्ठावान आमदार आहे. हा निष्ठावान आमदार सकाळी मातोश्री आणि संध्याकाळी एकनाथ शिंदे यांच्याकडे असतो, असा घणाघाती हल्ला माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे. तसेच, आमदार झाल्यापासून कळले नाही का, की तिथं जाऊन पुतळा पहावा, असा टोलाही राणेंनी नाव न घेता आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांना लगावला. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही याप्रकरणावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यावरुन, आता नारायण राणेंनी थेट शरद पवार यांच्यावरच हल्लाबोल केला. शरद पवार यांनी किती देवळे बांधली सांगा, यांना चांगले काहीच दिसत नाही. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारी माणसे आहेत. राहुल गांधींबाबत तर काय बोलावे, त्यांचा धर्म कोणता आहे हेच कळत नाही, अशा शब्दांत राणेंनी विरोधकांना टोला लगावला. जे विरोधक आता पुतळ्याबाबत बोलत आहेत त्यांनी ८ महिन्यांत पुतळा कसा झाला आहे, हे बघितले का? त्याला एखादा हार घातला का?, असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

पुतळा घटनेचे विरोधकांकडून राजकारण होत असल्याचा आरोप

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. विशेष म्हणजे ८ महिन्यांपूर्वीच उभारण्यात आलेला हा पुतळा वाऱ्याच्या वेगाने कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर राज्यातील विरोधकांनी पुतळ्याच्या उभारणीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी घटना घडल्यानंतर तात्काळ घटनास्थळ गाठून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विरोधकांकडून छत्रपतींच्या पुतळा प्रकरणाचे राजकारण केले जात असल्याचे सत्ताधाऱ्यांनी म्हटलंय. आता, माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांनी याबाबत बोलताना थेट शरद पवारांवरच हल्लाबोल केला.

याप्रकरणाची चौकशी केली जाईल

कालचा हवेचा स्पीड बघा, घर पडतात, बिल्डिंग पडतात. बंदशिवाय यांना काय येतेय. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. काँग्रेस सगळ्या क्षेत्रात बदनाम आहे, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. या सगळ्यांना मी उघडे करीन, असेही खासदार नारायण राणेंनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -