ठाकरे गटाचा २० ते २२ जागांसाठी आग्रह, शरद पवार गट ७ जागांसाठी उत्सुक
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींनी वेग घेतला आहे. राज्यात पुढच्या दोन महिन्यांनी विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीमधील प्रत्येक पक्षाला सर्वात जास्त जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. महाविकास आघाडीचं मुंबईमतील जागावाटपाचं भिजत घोंगडं कायम राहिलेलं आहे. काही जागांवर दोन पक्ष तर काही जागांवर तीनही पक्षांचा दावा कायम आहे. महाविकास आघाडीच्या घटकपक्षांच्या जागावाटपासाठी बैठकादेखील सुरु झाल्या असून काही दिवासांपूर्वी महाविकास आघाडीची नुकतीच मुंबईतील जागांच्या वाटपासाठी बैठक पार पडलेली. त्यामुळे माविआच्या पूढच्या बैठकीतही मुंबईतल्या जागांसंदर्भात चर्चा जोरदार होत राहणार आहे २० ते २२ जागांवर शिवसेना ठाकरे गट अजूनही आग्रही आहे. अशातच त्यामधल्या काही जागांवर काँग्रेसही आग्रही आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने मुंबईमधल्या ५ ते ७ जागांवर आपला दावा सांगितलं आहे.
मुंबईत महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात (Seat Sharing) बैठक पार पडली. आगामी विधानसभेसाठी या बैठकीत जागा वाटपाच्या रणनितीवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. काँग्रेस हायकमांड मुंबईतील वादाती जागांचा निर्णय सोडवणार असल्याचीसुद्धा माहिती आहे. काँग्रेस नेत्यांकडून मविआतील घटक पक्षाकडे भूमिका स्पष्ट झाली आहे. काँग्रेस नेत्यांनी जागेबाबतचा हायकमांडचा निर्णय मान्य असेल अशी भूमीका स्पष्ट केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस-ठाकरे गटात जागांवरुन मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी बैठकांमध्ये जागावाटपाचा निर्णय होईल असा विश्वास मविआतील नेत्यांना आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत हव्यात सात जागा
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सात जागा हव्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे सात जागांसाठी प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. विशेषतः म्हणजे मुंबईतील कुर्ला, घाटकोपर पूर्व, वर्सोवा, जोगेश्वरी, दहिसर, अणुशक्ती नगर, मलबार हिल या जागांवर राष्ट्रवादी लढवण्यास इच्छुक असल्याचं समोर आलंय. मुंबईतील विधानसभेच्या जागांचा प्रस्ताव सादर केला आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
मुंबईमधील ६ लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या एकूण ३६ जागा आहेत. त्यापैकी, राष्ट्रवादी काँग्रेसने ७ जागांवर मागणी केली आहे. त्यामुळेच, उर्वरीत जागा काँग्रेसआणि ठाकरेंच्या शिवसेनाला सोडल्या जातील. त्यामुळे, नेमकं किती आणि कोणत्या जागा कोणत्या पक्षाला मिळतील, हे पुढच्या काही दिवसांत स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपात उशीर झालेल्या महायुतीसाठी डोकेदुखी ठरल्याने आता विधानसभेसाठी लवकरात-लवकर जागावाटप करण्याची योजना महायुतीच्या सर्वच पक्षांकडून आखली जात आहे.