जाणून घ्या सविस्तर माहिती
मुंबई : सध्या अनेक युवक सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असतात. मात्र शिक्षण कमी असल्यामुळे त्यांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न अपुरे राहते. अशाच तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मेगाभरती जारी केली आहे. ज्यामध्ये ८वी ते १२वी पास उमेदवार देखील अर्ज करु शकणार आहेत. पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट आणि चंदीगड हायकोर्टमध्ये ही भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०२४ असणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात ३०० पदांसाठी भरती केली जाणार आहे. उमेदवारांना https://highcourtchd.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. पात्र उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि फिजिकल टेस्टद्वारे होणार आहे.
वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष असावे. या नोकरीसाठी अर्ज करणारे उमेदवाराला ७०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी/ एसटी उमेदवाराला ६०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.