कोण करणार नेतृत्व? जाणून घ्या सविस्तर माहिती
मुंबई : भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संयुक्त अरब अमिराती आणि शाहजाह येथे महिला टी २० विश्वचषक २०२४ (Womens T20 World Cup) साठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली. ३ ते २० ऑक्टोबर दरम्यान या महिला टी-२० चे सामने खेळले जाणार असून हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) या संघाचे नेतृत्व करणार आहे. तर मराठमोळ्या स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिची उपकर्णधार पदावर निवड करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहावेळा वर्ल्ड कप उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियासमोर (अ) गटात भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचे आव्हान असणार आहे. तर (ब) गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश व स्कॉटलंड हे समोरासमोर असतील. प्रत्येक संघ गटात चार सामने खेळवले जातील. या सामन्यांमधून अव्वल स्थानी असणारे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरीचे सामने आयोजित करण्यात आले असून २० ऑक्टोबर रोजी अंतिम सामना दुबई येथे होणार आहे. त्यापूर्वी २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत १० सराव सामने होणार आहेत.
भारतील क्रिकेट खेळाडूंची नावे
हरमनप्रीत कौर ( कर्णधार), स्मृती मंधाना (उप कर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रीग्ज, रिचा घोष (यष्टिरक्षक), यास्तिका भाटीया (यष्टिरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, दयालन हेमलथा, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, संजना संजीवन.
राखीव खेळाडू – उमा चेत्री, तनुजा कनवर, सैमा ठाकोर