महाराष्ट्रासह भारतातील इतर राज्यांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
मुंबईमध्ये अनेक वर्षांपासून दहीहंडी साजरी केली जात आहे.
या उत्सवात दहीहंडीची हंडी मोठ्या उंचीवर बांधली जाते. मग अनेक गोविंदा पथक थर रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात.
मुंबई आणि वेगवेगळ्या इतर शहरांमध्ये काही दहीहंडीचे कार्यक्रम मोठ्या बक्षीस रक्कम, सेलिब्रिटींची उपस्थिती आणि तेथे आयोजित केलेले कार्यक्रमांमुळे प्रसिद्ध झाले आहेत. या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी देखील जमते.
जन्माष्टमीच्या मुहूर्तावर मुंबई आणि ठाणे शहरात अनेक दशकांपासून साजऱ्या होणाऱ्या या लोकप्रिय उत्सवात लाखो रुपयांची बक्षिसेही आहेत.
दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला बक्षीस म्हणून मोठी रक्कम दिली जाते.
(सर्व छायाचित्रे: अरुण पाटील)