Sunday, May 11, 2025

देशमहत्वाची बातमी

चंपाई सोरेन ३० ऑगस्टला भाजपमध्ये होणार सामील, दिल्लीत अमित शहांची घेतली भेट

चंपाई सोरेन ३० ऑगस्टला भाजपमध्ये होणार सामील, दिल्लीत अमित शहांची घेतली भेट

नवी दिल्ली: झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब केले आहे. तर ३० ऑगस्टला अधिकृतपणे पक्षाचे सदस्यत्व घेतील. दिल्लीतून गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे वरिष्ठ नेते चंपाई सोरेन यांनी भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एका पोस्टद्वारे या बातमीला दुजोरा दिला.


हिमंत बिस्वा सरमा यांनी रात्री साडेअकरा वाजता सोशल मिडिया एक्सवर लिहिले, झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि आमच्या देशातील दिग्गज आदिवासी नेते चंपाई सोर्न यांनी काही वेळापूर्वी माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.


 


सरमा यांनी सांगितले की चंपाई सोरेन ३० ऑगस्टला रांचीमध्ये भाजपमध्ये सामील होतील. यासोबतच हे स्पष्ट आहे की चंपाई सोरेन जेएमएमपासून वेगळे होऊन नवीन पक्ष स्थापन करणार नाही.



का नाराज झाले चंपाई सोरेन?


झारखंडचे टायगर या नावाने ओळखले जाणारे प्रसिद्ध चंपाई सोरेन दोन फेब्रुवारीला मुख्यमंत्री बनले होते. त्यांनी हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर झारखंडचे नेतृत्व केले होते. दरम्यान, हेमंत सोरेन यांची तुरूंगातून सुटका झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. हेमंत सोरेन पुन्हा मुख्यमंत्री बनले. या फेरबदलावर चंपाई सोरेन यांनी नाराजी व्यक्त केली.

Comments
Add Comment