Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या जोरदार भांडण होतंय. ‘ए’ टीममध्ये उभी फूट पडल्याचं पाहायला मिळतय. अरबाज, जान्हवी, वैभव, निक्की, घन:श्याम हे सगळे सदस्य पहिल्या दिवसापासून एकत्र दणक्यात गेम खेळत होते. परंतु, गेल्या काही दिवसांत बिग बॉसच्या घरात अशा काही घटना घडल्या की, या पाच जणांच्या कट्टर मैत्रीत आता प्रचंड दुरावा निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. नेहमीच एकमेकांसाठी खंबीरपणे भांडणारी ‘ए’ टीम आता आपआपसांत भांडत असल्याचं दिसत आहे.
पाचव्या आठवड्याला सुरुवात झालेली आहे आणि त्यातच निक्की-अरबाजमध्ये सुरुवातीला अभिजीतवरून भांडणं होणार आहे. तर, याच वादात नंतर वैभव उडी मारणार आहे. निक्कीला भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने तिच्या विरोधात तिचे मित्रमंडळी कशा चुगल्या आणि चुकीचं बोलत असतात, याच्या क्लिप्स दाखवल्या होत्या. या सर्व व्हिडीओ पाहून निक्कीने सर्वांसमोर खुले आम चॅलेंज दिलं की, ती आता ‘ए’ टीमधून एक्झिट घेत आहे. निक्कीने तिचा ग्रुप सोडल्यापासून या सगळ्या सदस्यांमध्ये जोरदार भांडणं होत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे.
निक्की – अरबाजमध्ये वाद
अभिजीत व निक्कीला एकत्र पाहून अरबाजने घरात आदळआपट केल्याचं आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. अरबाज घरातली भांडी फोडून आपला राग व्यक्त करतो, यानंतर या वादात वैभव आणि जान्हवी उडी घेतात. निक्की सर्वांनाच उद्देशून सांगते, “मी महाराणी आहे” यावर जान्हवी म्हणते, “तुझ्यात तर नोकराणी व्हायची देखील क्षमता नाहीये.”
निक्कीवर वैभव देखील संतापतो त्यावर ती म्हणते, “वैभव तुझी लायकी आहे का कॅप्टन होण्याची…” पुढे, “ए नासके बस्स कर आता” असं म्हणत वैभव तिला ताकीद देतो. यानंतर निक्की वैभवला “बच्चू चल जा” म्हणत चांगलीच हिणवते.
https://www.instagram.com/reel/C_KaLDvybSe/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
शेवटी वैभव निक्कीला म्हणतो, “थोबाड दिलंय म्हणून काहीपण बोलू नकोस… नाही तुझी मस्ती जिरवली तर बघ” असं सांगतो. यावर निक्की त्याला “गप्प भुसनाळ्या” म्हणते. हा प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. आणि सोशल मीडियावर जास्तच चर्चेत आलेला आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यामधील आक्षेपार्ह भाषा…दोन्ही सदस्यांनी चुकीचे शब्द वापरून एकमेकांना अपमानित केलं आहे. आता हा वाद मिटणार की, अजून वाढणार हे प्रेक्षकांना आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.