भिवंडी : भिवंडी शहरात टँकर घेऊन डिझेल विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघा जणांना शांतीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्या जवळून टँकर व १५ हजार लिटर डिझेल असा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भिवंडी कल्याण रस्त्यावरील साईबाबा मंदिर हिना गॅरेज समोरील रस्त्यावर दोन व्यक्ती अवैध डिझेलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त बातमी शांतिनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे यांना मिळाल्यानंतर त्यांच्या पथकातील पोलीस पथकाने घटनास्थळी सापळा रचून अजित चोविसलाल यादव, वय ३४ रा.बेलापूर नवी मुंबई,व चालक आरीफ जलालुदीन खान, वय ४२ रा. मानखुर्द, मुंबई यांना ताब्यात घेतले.
त्यांच्या जवळ टँकर मधील डिझेल बाबत कोणतीही कागदपत्रे आढळून न आल्याने त्यांनी हे डिझेल विक्रीसाठी घेऊन आल्याचे निष्पन्न झाल्याने शांतीनगर पोलिसांनी १० लाख ८० हजार रुपये किमतीचे १५ हजार ५०० लिटर डिझेल व १० लाख रुपयांचा टँकर असा एकूण २० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याी माहिती विनायक गायकवाड यांनी दिली.