Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडी5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह येतो हा 5G फोन, किंमत ११ हजारांपेक्षाही...

5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह येतो हा 5G फोन, किंमत ११ हजारांपेक्षाही कमी

मुंबई: भारतीय बाजारात बजेट फ्रेंडली स्मार्टफोनची मोठी मागणी आहे. अशातच लोक कमी किंमतीत अधिक फीचर्सच्या फोन्सना मोठी पसंती देतात. यातच आज तुम्हाला अशा 5जी फोनबद्दल सांगत आहोत ज्यात कंपनीने 5000mAhची दमदार बॅटरी सादर केली आहे. सोबतच ५० मेगापिक्सेलचा कॅमेराही दिला आहे. या स्मार्टफोनची किंमत ११ हजारांपेक्षा कमी आहे.

Redmi 13C 5G Specifications

Redmi 13C 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने MediaTek Dimensity 6100+ सीपीयूचा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. यासोबतच स्मार्टफोनमध्ये ६.७४ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz चा रिफ्रेश रेट दिला आहे.

याशिवा या स्मार्टफोनमध्ये १६ जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅमसोबत 256GB पर्यंतचा स्टोरेज मिळतो. हा फो 4GB/6GB/8GB सारख्या रॅमच्या पर्यायांसोबत येतो.यात 128GB/256GB यासारखे दोन ऑप्शन मिळतात.

पावरसाठी स्मार्टफोनमध्ये 5000 mAhची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 18W च्या रॅपिड चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास Redmi 13C 5G मध्ये 50MPचा AI प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 5MPचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.

Redmi 13C 5G फोनच्या सुरूवातीची किंमत १०,४९९ रूपयांपासून सुरू होते. तर फोनच्या 4GB+128GB व्हेरिएंटची किंमत १०,४९९ रूपये आहे. सोबतच या स्मार्टफोनच्या 6GB+128GB व्हेरिएंटची किंमत ११, २५४ रूपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय फोनच्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत १३,४१० रूपये ठेवण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -