अभिनेत्री सायली संजीव ही मराठी मनोरंजन विश्वातील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे.सायलीने हे फोटोशूट अन्मेया या क्लोदिंग ब्रँडसाठी केलं आहे.सायलीने या ब्रँडच्या वेगवेगळ्या पोशाखांमध्ये फोटो काढले आहेत.नुकतंच सायलीने गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.सिल्क कॉटनच्या फुलस्लीव्ह ड्रेसमध्ये सायली सुंदर अतिशय दिसत होती.यावेळी सायलीने केस मोकळे सोडले होते, तर कानात मोठे कानातले परिधान केले होते.सायलीच्या या गोजिरवाण्या फोटोंवर चाहत्यांंनी लाइक्स आणि कमेन्ट्सचा वर्षाव केला आहे.