Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीRussia Ukraine War: ९/११ सारखा युक्रेनचा रशियावर भयानक हल्ला, बहुमजली इमारतीमध्ये घुसवलं...

Russia Ukraine War: ९/११ सारखा युक्रेनचा रशियावर भयानक हल्ला, बहुमजली इमारतीमध्ये घुसवलं ड्रोन

मॉस्को: युक्रेन (Ukraine) आणि रशिया (Russia) मधील युद्ध जवळपास अडीच वर्षे लोटून गेली तरी अद्याप सुरूच आहे. तसेच सध्या अनिर्णितावस्थेत युद्धामध्ये असलेल्या या युक्रेनने रशियावर जबरदस्त पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आज युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. युक्रेनने रशियाच्या सारातोव्ह परिसरामध्ये एका बहुमजली इमारतीवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला आहे. रशियावर करण्यात आलेला ड्रोन हल्ला साधासुधा नसून अगदीच अमेरिकेच्या ९/११ च्या हल्ल्यासारखाच आहे. रशियामधील एंजेल्स हवाई तळावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे. युक्रेनने रशियामधल्या ३८ मजली इमारतीत ड्रोननं हल्ला केला आहे.

आज (२६ ऑगस्ट) युक्रेननं रशियातील ३८ मजली उंच इमारतीवर ड्रोननं उडवून हल्ला केला. युक्रेनचे ड्रोन थेट इमारतीत घुसलं. या ड्रोनच्या धडकेनं किमान २ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना व्होल्गा स्काय या सेराटोव्ह शहरातील सर्वात उंच ३८ मजली इमारतीची आहे. त्याचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनुसार, एक ड्रोन उडताना दिसत आहे, ते ड्रोन थेट ३८ मजली इमारतीत घुसलं आणि आग लागली. इमारतीच्या काही काचा फुटल्यानं खाली उभ्या असलेल्या २० हून अधिक वाहनांचंही नुकसान झालं आहे.

या युद्धाच्या सुरुवातीच्या काळात रशियाने युक्रेनमधील बहुतांश भाग तुफानी हल्ले करून खाक करून टाकला होता. मात्र नंतर युक्रेनने दणक्यात लढून रशियाला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली होती. युक्रेनकडून रशियावर मागच्या काही दिवसांपासून सातत्याने ड्रोनच्या माध्यमातून हल्ले केले जात आहेत. दरम्यान, आज युक्रेनने रशियावर जबरदस्त प्रहार करत रशियाला या युद्धात सहजासहजी बाजी मारू देणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

मात्र, युक्रेनला या हल्ल्याची जबर किंमत मोजावी लागू शकते. असा दावा आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. तसेच या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून रशिया यु्क्रेनवर मोठा हल्ला करून पुन्हा पलटवार करू शकतो. दरम्यान, युक्रेनने मागच्या आठवड्यात रशियावर असाच ड्रोन हल्ला केला होता. त्यावेळी ४५ ड्रोन युक्रेनने रशियाच्या दिशेने पाठवले होते. मात्र हे सर्व ड्रोन रशियाने नष्ट करून टाकले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -