मुंबई: हवामान विभागाने मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विभागाच्या माहितीनुसार उत्तर-पश्चिम मध्य प्रदेश आणि याच्या बाजूच्या राजस्थानामध्ये एक दबाव क्षेत्रामध्ये बदल झाला आहे. यामुळे पुढील दोन ते तीन दिवस या राज्यांमध्ये तसेच गुजरात, गोव्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
आयएमडीच्या माहितीनुसार २५ ऑगस्टला रात्री साडेअकराच्या सुमारास हे गहरे क्षेत्र चित्तोडगड, राजस्थानच्या जवळ ७० किमी दक्षिण-दक्षिणपूर्व केंद्रित होते. यामुळे राजस्थान आणि गुजरातच्या हवामानावर याचा परिणाम झाला.
हवामान विभागाचा रेड अलर्ट
हवामान विभागाच्या माहितीनुसार बांग्लादेश आणि बाजूच्या गंगेच्या पश्चिम बंगाल क्षेत्रात एक आणि निम्न दबाव क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे उत्तर ओडिशा, झारखंड येथे पुढील दोन दिवस या क्षेत्रात आणखी दबाव वाढण्याची शक्यता आहे.
आयएमडीने रेड अलर्ट जारी करताना सांगितले की २६ ऑगस्टला पश्चिम मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. याचप्रमाणे पूर्व आणि दक्षिण राजस्थान, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये २६ ते २९ ऑगस्टपर्यंत अशीच स्थिती राहणार आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा झारखंडमध्येही दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
३० ऑगस्टपर्यंत खराब राहू शकते हवामान
आयएमडीने इशारा देताना सांगितले की २६ ऑगस्टला मध्य प्रदेशात हवेची गती ५० किमी प्रति तासाच्या वेगापर्यंत पोहोचू शकते.