Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीPM Modi Invitation: शाहबाज शरीफ यांचं तब्बल ८ वर्षांनी निमंत्रण, पंतप्रधान मोदी...

PM Modi Invitation: शाहबाज शरीफ यांचं तब्बल ८ वर्षांनी निमंत्रण, पंतप्रधान मोदी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार का?

नवी दिल्ली: शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) याच पाकिस्तानमध्ये १५-१६ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आलं आहे. शाहबाज शरीफ यांनी या बैठकीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना निमंत्रण धाडलं आहे. कौन्सिल ऑफ गव्हर्नमेंट (CHG) च्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी हे निमंत्रण इतर नेत्यांसह पंतप्रधान मोदींना देण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५-१६ ऑक्टोबर रोजी सीएचजीची बैठक होणार आहे. गेल्या ८ वर्षांमध्ये ह्या वर्षी पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानांना पाकिस्तानकडून निमंत्रित करण्यात आलं आहे.आता तणावपूर्ण संबंधांमध्ये पाकिस्तानच्या निमंत्रणानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात जाणार का? असा प्रश्न इथे उपस्थित केला जात आहे. दरम्यान, SCO चे अध्यक्षपद सध्या पाकिस्तानकडे आहे.

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे यजमानपद सर्व सदस्य देशांकडे दिले जाते. यंदाची जबाबदारी पाकिस्तानवर आली आहे. इस्लामाबादमध्ये १५-१६ ऑक्टोबर रोजी SCO बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी पाकिस्तानचे वझीर-ए-आझम शाहबाज शरीफ यांनी भारताच्या पीएम मोदींना निमंत्रण दिले आहे. मात्र, पीएम नरेंद्र मोदी इस्लामाबादला जाण्याची शक्यता कमी आहे. विशेष म्हणजे, PM नरेंद्र मोदी नेहमीच विविध देशात आयोजित केलेल्या SCO बैठकीला उपस्थित राहतात, परंतु कझाकिस्तानमध्ये झालेल्या बैठकीला ते उपस्थित राहिलेले नव्हते. पंतप्रधानांच्या जागी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बैठकीला उपस्थिती लावली होती. त्यामुळे यंदाही पंतप्रधान मोदी पाकिस्तानात जाण्याची शक्यता कमी आहे.

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) म्हणजे काय?

१५ जून २००१ रोजी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) ची स्थापना झाली आहे. सुरुवातीला त्यात फक्त चीन, कझाकिस्तान, रशिया, किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान याचा समावेश होता. २००१ मध्ये शांघाय फाइव्हवरुन शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये बदली झाल्यानंतर उझबेकिस्तानचा या संघटनेत समावेश करण्यात आला. २०१७ मध्ये भारत आणि पाकिस्तान SCO चे सदस्य झाले आणि इराणने २०२३ मध्ये सदस्यत्व घेतले. २०२४ च्या शिखर परिषदेत बेलारुसच्या सहभागानंतर सदस्य देशांची संख्या १० झाली आहे.

भारताकडून कोण जाणार? संपूर्ण देशाचं याकडे लक्ष

भारत आणि पाकिस्तानात बऱ्याच काळापासून तणावपूर्ण संबंध सुरू आहेत. तरीसुद्धा काही असेसुद्धा मुद्दे आहेत, जिथे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांनी एकत्र येऊन निर्णय घेतले आहेत. २०२३ मध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जरदारी हे भारतात झालेल्या एससीओच्या बैठकीत सहभागी झाले होते. दरम्यान, आता सीएचजी बैठकीला भारताच्या बाजूने कोण उपस्थित राहणार याबाबत सध्या कोणताही निर्णय झालेला नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -