Monday, June 16, 2025

कुडाळमध्ये विनयभंग प्रकरणी एकास अटक

कुडाळमध्ये विनयभंग प्रकरणी एकास अटक

कुडाळ : कामावर जाणाऱ्या युवतीचा पाठलाग करून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित आवेज अब्दुल नाईक, (सरंबळ-दुर्गावाड, ता. कुडाळ) याला कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. या प्रकरणी एका तरुणीने कुडाळ पोलिसात तक्रार दिली आहे. त्यावरून त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पीडित तरुणी एका शो रूममध्ये कामाला आहे. काल रविवारी २५ ऑगस्ट रोजी ती कामावर जात असताना आवेज अब्दुल नाईक या तरुणाने त्या तरुणीचा छुपा पाठलाग करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या तरुणीने नकार देऊनही संशयित आरोपी हा तिचा पाठलाग करत असून तरुणी व तिच्या आईच्या मोबाईलवर त्याने धमकीचे मेसेज पाठविले आहेत. तसेच त्या तरुणीचे आरोपीकडील मोबाईल मधले फोटो तिची बदनामी करण्याकरिता सोशल मीडियावरही पोस्ट केले आहेत.


त्या तरुणीने दिलेल्या या तक्रारीवरून संशयित आवेज अब्दुल नाईक याच्यावर कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मध्यरात्री त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार माने अधिक तपास करीत आहेत.

Comments
Add Comment