Kangana Ranaut On Farmers Protest : 'शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर बलात्कार अन् हत्या...' कंगना रणौत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि बॉलीवूडची अभिनेत्री कंगना राणौत (Kangna Ranaut) आपल्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. कंगनाने शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद झाला होता. दरम्यान, आता कंगनाने शेतकरी आंदोलनाबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्कार झाल्याचा आरोप तिने केला आहे. कंगनाची या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

'...तर पंजाबचा बांग्लादेश झाला असता'


दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली की, 'आपल्या देशाचे सर्वोच्च नेतृत्व मजबूत नसते, तर या लोकांनी पंजाबला बांग्लादेश बनवलं असतं. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालू होतं, ते संपूर्ण देश पाहत होता. निषेधाच्या नावाखाली हिंसाचार कसा पसरवला गेला. अनेक माणसे आंदोलनादरम्यान मारली गेली, मृतदेहांना लटकवले गेले, बलात्कार झाले...सरकारने कृषी विधेयक मागे घेताच या साऱ्यांना धक्का बसला. कारण त्यांची प्लॅनिंग खुप मोठी होती. त्यांच्यावर सरकारने वेळीच नियंत्रण मिळवले, अन्यथा ते काहीही करू शकले असते. 'सध्या पंजाबमध्ये ड्रग्ज माफिया, धर्मांतर करणाऱ्या टोळ्या आणि फुटीरतावादी खलिस्तान समर्थक फोफावत आहेत. तिथे काही लोक नेहमीच कायदा हातात घेत आहेत, हे योग्य नाही. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. माझ्यावर हल्ला करुन माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. तिथे जे काही होत आहे, ते योग्य नाही,' असं कंगना म्हणाली आहे.


बॉलिवूड बांग्लादेशातील परिस्थितीवर गप्प


बॉलिवूडमधील बांग्लादेशातील परिस्थितीवर कुणीही भाष्य केले नाही. यावर कंगनाने म्हणाली की, 'या लोकांना काहीही माहिती नसतं. ते फक्त आपल्याच तंद्रीत असतात. सकाळी मेकअप करुन बसतात, देशात किंवा जगात काय सुरु आहे, या गोष्टींनी त्यांना काही फरक पडत नाही. आपले काम असेच चालू राहावे, देश नरकात गेला तरी चालेल. मात्र, देशाचे काही नुकसान झाले, तर त्यांचेही मोठे नुकसान होईल, हे ते विसरून जातात,' अशी तीव्र प्रतिक्रिया कंगनाने दिली आहे.

कोलकाता बलात्कारावर म्हणाली...


माझ्यासाठी 'महिलांची सुरक्षा' हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. मी महिलांच्या सुरक्षेबाबत खूप गंभीर आहे आणि महिलांच्या समर्थनार्थ आवाज उठवते. मी आमिर खानच्या 'सत्यमेव जयते' या शोमधून आयटम नंबरलाही विरोध केला होता. एखाद्या महिलेचं शरीर फक्त मनोरंजनासाठी असतं का?,' असा प्रश्नही तिने यावेळी उपस्थित केला.

काँग्रेसवर खडतर टीका


दरम्यान, आता काँग्रेस कंगनाने शेतकरी आंदोलनाविषयी केलेल्या वक्तव्यावरुन आक्रमक झाली आहे. पंजाब काँग्रेसचे नेते राजकुमार वेरका यांनी तर कंगना राणौतवर NSA लागू करण्याची मागणीसुद्धा केली आहे. वेरका म्हणाले, 'कंगना रणौत नेहमी पंजाबच्या नेत्यांबाबत गरळ ओकते. तिने शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटले, आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. भारतीय जनता पक्षाने या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कंगनाच्या विरोधात एफआयआर नोंदवावा,' अशी मागणी वेरका त्यांनीयांनी केली आहे.
Comments
Add Comment

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी