Thursday, March 27, 2025
HomeदेशJanmashtami 2024: कृष्ण जन्माष्टमीचा आज सोहळा, हा आहे पुजेचा शुभ मुहूर्त

Janmashtami 2024: कृष्ण जन्माष्टमीचा आज सोहळा, हा आहे पुजेचा शुभ मुहूर्त

मुंबई: आज देशभरात कृष्ण जन्माचा सोहळा साजरा केला जात आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला हा सण साजरा केला जातो. ही तीच तिथी आहे जेव्हा भगवान विष्णूंनी द्वापार युगात भगवान कृष्णाच्या रूपात आठवा अवतार घेतला होता. ज्योतिषानुसार भगवान श्रीकृष्णांचा हा ५२५१ जन्मोत्सव आहे.

जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाच्या बाल स्वरूपाची पुजा केली जाते. या दिवशी उपवास केला जातो. श्रीकृष्णाला पाळण्यात जोजवले जाते. पंचामृताने स्नान घातले जाते.

श्रीकृष्ण पुजेचा शुभ मुहूर्त

यावर्षी २६ ऑगस्टला हा सण साजरा केला जात आहे. आज श्रीकृष्णाच्या पुजेचा शुभ मुहूर्त मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते १२.४४ वाजेपर्यंत असणार आहे. म्हणजेच पुजेसाठी ४४ मिनिटे मिळणार आहे. या कालावधीत श्रीकृष्ण जन्म होईल आणि जन्मोत्सव साजरा केला जाईल.

जन्माष्टमीला करू नका या चुका

या दिवशी तुमच्या घरातून कोणालाही रिक्त हस्ते धाडू नका. आपल्या कुवतीनुसार अन्न आणि वस्त्र दान करा.
तामस आहार करू नका. सात्विक भोजन करा.
दारू अथवा मांसाहाराचे सेवन करू नका.
कोणत्याही पशुपक्ष्याला त्रास देऊ नका.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -