Sunday, May 11, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

Hardik Pandya: नताशापासून वेगळे झाल्यानंतर कोणासोबत फिरतोय हार्दिक पांड्या?

Hardik Pandya: नताशापासून वेगळे झाल्यानंतर कोणासोबत फिरतोय हार्दिक पांड्या?

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराऊंडर क्रिकेट हार्दिक पांड्या सध्या सुट्टीवर आहे. तो अखेरच्या वेळेस श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेत खेळला होता. त्याने वनडे मालिकेतून आपले नाव मागे घेतले होते. पांड्या पत्नी नताशा स्टेनकोविकपासून वेगळे झाल्यानंतर तुटला होता. दरम्यान तो स्वत:ला सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या तो विदेशात फिरत आहे. मात्र तो कोणासोबत आहे हे सांगितले जाऊ शकते.


पांड्याने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. यात तो ट्रेनमध्ये बसलेला दिसत आहे. पांड्या फिरण्यासाठी निघाला आहे. मात्र तो कोणासोबत फिरत आहे याची माहिती मिळालेली नाही. पांड्याचे फोटो कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने क्लिक केले आहेत. अशी अफवा होती की पांड्या सध्या जास्मिनला डेट करत आहे. मात्र याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


 



हार्दिक आणि नताशा का वेगळे झालेत. टाइम्स नाऊच्या माहितीनुसार पांड्याला अतिशय चकचकी त आयुष्य पसंत होते. दरम्यान, नताशाला शांत आणि सरळ आयुष्य जगायला आवडत होते. नताशाने पांड्यासोबत राहण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र तिला या वातावरणात अॅडजस्ट करायला जमले नाही.

Comments
Add Comment