Friday, March 28, 2025
Homeसाप्ताहिकमजेत मस्त तंदुरुस्तGinger Water: दररोज रिकाम्या पोटी प्या आल्याचे पाणी, हे होतीत ‘५’ फायदे

Ginger Water: दररोज रिकाम्या पोटी प्या आल्याचे पाणी, हे होतीत ‘५’ फायदे

भारतीय स्वयंपाकघरात, आपण सकाळच्या चहापासून ते भाज्यांपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये अद्रक वापरतो. जेवणातली चव वाढवण्यासाठी आपण अनेकदा भाज्यांमध्ये आल्याचा वापर हमखासपणे करतो. विशेषत: म्हणजे आल्याचा वापर हिवाळ्यात जास्त प्रमाणात केला जातो जेणेकरून ते शरीराला उबदार ठेवण्यास मदत करते. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, आले हे दिसायला विचित्र असले तरी त्यात भरपूर पोषक असतात. त्यात कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, कॉपर, मॅंगनीज क्रोमियम झिंक, असते. आल्याबद्धल अनेकदा एक समज आहे की ते पोटाला गरम करते, पण ते रिकाम्या पोटी पिणे योग्य आहे का? तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला आल्याची कोणतीही विशिष्ट ऍलर्जी नसेल तर तुम्ही रिकाम्या पोटी आल्याचे पाणी हमखासपाने पिऊ शकता. यातून तुमच्या शरीराला आवश्यक फायदे मिळतील.

पहाटे रिकाम्या पोटी आल्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे येथे आहेत.

१) जर तुम्हाला चरबी लवकरात-लवकर कमी करायची असेल तर अदरकचे पाणी चयापचय गती वाढवते. या परिस्थितीत अदरकचे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने तुमची चयापचय गती वाढते. ज्यावेळी तुमची चयापचय क्रिया योग्यरित्या कार्य करत असते, त्यावेळी दिवसभरात सामान्य काम करत असतानाही कॅलरीज बर्न होतात. जे चरबी लवकरात लवकर बर्न करण्यास मदत करते. नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्यास शरीराला हे खूप मदत करते.

२) आल्याचं पाणी मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही रिकाम्या पोटी आल्याचे पाणी प्यायल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. हे तुमच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. मधुमेहाशी होणाऱ्या ज्या समस्या असतात त्यादेखील दूर होण्यास मदत होते.

३) आल्याचे पाणी (Ginger Water) त्वचेसाठी फायदेशीर आहे. आल्याचे पाणी शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते. त्यामुळे शरीरातील घाणही निघून जाते. अदरकमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सशी लढण्यात यशस्वी ठरतात जे कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे कारण असू शकतात. आले त्वचेवर पुरळ, आणि सुरकुत्या व बारीक रेषा यांसारख्या वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यास मदत करते. हे रक्ताशी संबंधित विकार दूर करण्याचे काम करते, ज्याचा थेट परिणाम त्वचेवर होतो.

४) शरीरातील सूज कमी करण्यासाठीदेखील आल्याच्या पाण्याने उपयोगी ठरते. तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारची सूज जर असेल तर दररोज आल्याचे पाणी आवर्जून प्या, शरीरातील सूज कमी होते. आले सूज आणि संबंधित रोग दूर करते. जळजळ आणि जंतू निर्माण करणार्‍या हानिकारक जीवाणूंशी लढण्यासाठी ते उपयुक्त बनवते. जुनाट जळजळीशी लढण्यासाठी अदरकाचे पाणी खूप फायदेशीर आहे.

५) रिकाम्या पोटी आल्याचे पाणी पिणे पोटासाठी फायदेशीर आहे पचनक्रिया मजबूत करते. बद्धकोष्ठता, गोळा येणे, अदरक पाणी अपचन, उलट्या मळमळ आणि जुलाब यासारख्या समस्या दूर करण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. याशिवाय हे शरीरामधील खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकण्यासही मदत करते. हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यांसारख्या आजारांचा धोका कमी करण्यासोबतच हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -