Dahihandi festival : मनसेचा डोंबिवली पूर्वेतील दहीहंडी उत्सव रद्द!

आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी दिली माहिती


डोंबिवली : बदलापूर येथे दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मनसेने यावर्षी डोंबिवली पूर्वेतील चार रस्तावरील दहीहंडी उत्सव (Dahihandi festival) रद्द करत आहोत अशी घोषणा कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी केली. परिणामी यावर्षी चार रस्ता येथे मनसेची दहीहंडी उभारण्यात येणार नाही.


याबाबत आमदार पाटील म्हणतात, बदलापूरातील या पीडित दोन कुटुंबांच्या घरात घडलेल्या या प्रकारामुळे ही कुटुंबे दुखी आहेत. यासाठी आपल्या पाठीशी संपूर्ण समाज आहे हे दाखविणे आवश्यक आहे. या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मनसे त्यांना साथ देणार असेही पाटील सांगतात.


वर्षोनुवर्षे डोंबिवलीत आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करतच असतो पण यावर्षी बदलापूर येथील अशा निंदनीय घटनेचे सावट या उत्सवावर आहे म्हणून बदलापूर, डोंबिवली शहरात मनसेने आयोजित केलेला दहीहंडी उत्सव रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.


बदलापूर येथील आदर्श विद्यालयात दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला. या घटनेबाबत शाळेतील आरोपी नराधमावर गुन्हा दाखल करून घेण्यात मनसेच्या बदलापूरातील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत घटनेला वाचा फोडली. अशा घटना होवू नयेत यासाठी मनसेच्या डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली परिसरातील शाळांमध्ये जाऊन शाळा व्यवस्थापनांना मुलींच्या सुरक्षिततेबाबत घ्यावयाची काळजी, तसेच याविषयी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्यांनी प्रत्येक शाळेला एक छापील पत्रक देऊन मनसे पदाधिकारी त्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी शाळा व्यवस्थापनाने करावी म्हणून प्रयत्न करत आहेत.


दरवर्षी पूर्वेकडील चार रस्ता येथील पाटणकर चौकात मनसेच्या माध्यमातून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी या भागातील वाहतुकीत वाहतूक विभागाने बदल केला होता. पण आता दहीहंडी रद्द झाल्याने येथील वाहतूक नेहमीप्रमाणेच राहील असे दिसत आहे.

Comments
Add Comment

Chinchpokli-cha Chintamani : यंदाच्या गणेशोत्सवात लालबाग-परळ होणार ‘तिरूपती’मय; ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चा आगमन सोहळा थाटात संपन्न

मुंबई : मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासातील मानाचे पान असलेल्या लालबाग-परळ भागातील ‘चिंचपोकळीचा

Smart Ration Card : स्मार्ट रेशन कार्ड वाटप सुरू; QR कोड असलेल्या अत्याधुनिक कार्डाची वैशिष्ट्ये आणि प्रक्रिया

महाराष्ट्रातील शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी असून, पारंपारिक कागदी रेशन कार्डऐवजी आता QR कोड

POK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोष उसळला; लष्करी नियंत्रणाविरोधात ‘संयुक्त आवामी कृती समिती’चे मोठ्या आंदोलनाचे आवाहन

पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) पाकिस्तानी लष्कराच्या दडपशाहीविरोधात तेथील नागरिकांचा संताप अखेर उफाळून आला आहे.

Floods in Nepal : नेपाळ आणि चीनमध्ये महापूर आणि हिमनदी फुटल्याने भीषण हाहाकार; ६०० हून अधिक मृत्यू, २४०० हून अधिक जण बेपत्ता

नेपाळ आणि चीनच्या सीमावर्ती हिमालयीन प्रदेशात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठी जीवितहानी झाली असून, आतापर्यंत

Jalgaon News : ...'जो दाग रह गये उन्हे मिटाके आऊंगा' ! 'सगळं सांभाळून घे दीदी, मी जातो' भावनिक मेसेज अन् रक्षाबंधनाच्या दिवशीच तरुणाचं टोकाचं पाऊल

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. सर्वत्र रक्षाबांधन या भाऊ- बहिणीच्या सणाचा उत्साह

Subhash Chandra : ₹22 हजार कोटींचे दावे, परतफेड फक्त ₹6.5 कोटी, NCLTच्या निर्णयानंतर सुभाष चंद्रांची नवी सुरुवात; स्वित्झर्लंडमध्ये कामाची योजना

नवी दिल्ली : झी आणि एस्सेल समूहाचे संस्थापक सुभाष चंद्र यांच्या वैयक्तिक दिवाळखोरी प्रकरणाला मोठे वळण मिळाले