Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीYogi Adityanath : 'बटेंगे तो और भी कटेंगे' - योगी आदित्यनाथ

Yogi Adityanath : ‘बटेंगे तो और भी कटेंगे’ – योगी आदित्यनाथ

आग्रा : आपण जर धर्म, पंत, संप्रदाय आणि जातीत वाटल्या गेलो तर मोठे नुकसान होईल ”बटेंगे तो और भी कटेंगे” (विभागल्या गेलो तर मारले जाऊ) असे सांगत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी सांगितले. आग्रा येथे कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दुर्गादास राठोड यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी योगी आदित्यनाथ म्हणाले की, आग्र्याच्या कणा-कणात कन्हैयाचा वास आहे. येथे कला, आस्था,समर्पण आणि विश्वास आहे.

समाज, जाती, भाषेवरून तोडणाऱ्या शक्तीपासून सावध राहण्याची गरज आहे. योगी यांनी राष्ट्रवीर दुर्गादास यांच्या इतिहासासोबतच काकोरी कटातील नायकांच्या के इतिहासावरही प्रकाशझोत टाकला. मुख्यमंत्री योगींनी म्हटले की, काकोरी कटातील नायक पंडित बिस्मिल यांना फाशी दिली जात होती तेव्हा इंग्रजांनी विचारले होते की, तुमची शेवटी इच्छा काय आहे. त्यावर त्यांनी म्हटले होते की, मला धरतीवरच १०० वेळा जन्म मिळावा आणि प्रत्येकवेळी देश व समाजासाठी मृत्यू यावा.

देशाच्या एकात्मतेवर बोलताना योगी म्हणाले की, ऐक्याशिवाय काहीही होऊ शकत नाही;काहीही साध्य होऊ शकत नाही. आपण एकजूट आणि विवेकी राहिलो तरच राष्ट्र मजबूत होईल. आपण फुटलो तर तुटून जाऊ. तुम्ही बघा. बांगलादेशात काय चालले आहे,त्या चुकांची पुनरावृत्ती इथे व्हायला नको. एकजुटीने राहण्यातच देशाची ताकद आहे. आपण जर विभाजित झालो तर कापले जाऊ असे त्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -