कल्याण : बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी (Badlapur case) अटकेत असलेला आरोपी अक्षय शिंदेला कल्याण न्यायालयाने १४ दिवसांची म्हणजेच ९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
याआधी न्यायालयाने त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कल्याण न्यायालयातील न्यायाधीश वी. ए. पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली होती. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा एकदा त्याला आज न्यायालयासमोर हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका आणि सेक्रेटरी यांना फरार आरोपी बनवण्यात आले आहे. तसेच पॉक्सो गुन्ह्यात काही कलमं वाढवण्यात आली आहेत.