Friday, October 31, 2025
Happy Diwali

किरणसोबतच्या घटस्फोटानंतर तिसऱ्यांदा लग्न करणार आमिर खान?

किरणसोबतच्या घटस्फोटानंतर तिसऱ्यांदा लग्न करणार आमिर खान?

मुंबई: आमिर खान आपल्या सिनेमांसोबतच खाजगी जीवनासाठीही नेहमी चर्चेत राहतात. खाजगी आयुष्याबद्दल लोक आमिरला अनेक सवाल करतात. आमिर खानने २ लग्ने केली. त्याने पहिले लग्न रीना दत्ता हिच्याशी केले होते. १९८६मध्ये आमिर आणि रीनाचे लग्न झाले होते.

त्यांचे हे लग्न १६ वर्षे टिकले होते. रीना आणि आमिर यांना दोन मुले आयरा आणि जुनैद आहे. रीनानंतर आमिर खानने किरण रावशी लग्न केले होते. किरण आणि आमिर यांना एक मुलगा आझाद आहे. काही वर्षांर्पूर्वी किरण आणि आमिर वेगळे झाले आहेत. रीना आणि किरणच्या या आयुष्यातून गेल्यानंतर आता प्रत्येकजण आमिरला विचारत आहे की तो तिसरे लग्न करणार का? यावर आमिरने मौन सोडले आहे.

किरण आणि आमिर यांनी २०२१मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले होते. आता नुकतेच आमिर रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये गेला होतो. तेथे त्याला पुन्हा लग्नाबाबत विचारण्यात आले.

तिसऱ्यांदा लग्न करणार आमिर?

जेव्हा रियाने आमिरला तिसऱ्या लग्नाबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला, मी आता ५९ वर्षांचा झालो आहोत. मला नाही वाटत की मी पुन्हा लग्न करू शकेन. कठीण वाटत आहे. माझ्या आयुष्यात सध्या अनेक नाती आहेत. मी पुन्हा माझ्या कुटुंबाशी जोडले गेलेलो आहे. माझी मुले, भाऊ, बहिणी आहेत. मी त्यांच्यांसोबत खुश आहे जे माझ्याजवळ आहेत. मी एक चांगला माणूस बनण्याच्या दिशेने काम करत आहे.

Comments
Add Comment