Monday, March 24, 2025
Homeक्राईमMumbai Crime : मुंबईत महिला डॉक्टरला मारहाण, कोलकाताची पुनरावृत्ती करण्याची धमकी

Mumbai Crime : मुंबईत महिला डॉक्टरला मारहाण, कोलकाताची पुनरावृत्ती करण्याची धमकी

मुंबई : मुंबईच्या मानखुर्द (Mumbai Crime) येथे पार्किंगच्या वादातून एका १६ वर्षीय तरुणाने महिला डॉक्टरला मारहाण केली आणि कोलकातातील घटनेची पुनरावृत्ती करण्याची गंभीर धमकी दिली आहे. हा प्रकार येथील साठेनगर परिसरात घडला.

नेमके प्रकरण काय?

महिला डॉक्टरने आपल्या दवाखान्याचे शटर उघडण्यासाठी समोर पार्क केलेली स्कूटी हलवली होती. काही वेळानंतर तरुणाने डॉक्टरकडे स्कूटी कोणी हलवली याची चौकशी केली. त्यावर महिला डॉक्टरने स्कूटी हलवल्याचे सांगितले. त्यावर तरुणाने डॉक्टरला शिवीगाळ केली, ज्यामुळे डॉक्टरने रागाच्या भरात त्याच्या कानशिलात लगावली.

या घटनेनंतर तरुणाने तीन महिला नातेवाईकांसोबत येऊन डॉक्टरला मारहाण केली. यावेळी तरुणाने धमकी दिली की, “कोलकात्यात काय झालं माहितीये ना, तशीच तुझीही अवस्था करेन.” या धमकीने महिला डॉक्टर अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी लगेचच मानखुर्द पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दरम्यान, पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून, तक्रारीच्या आधारे चौकशी सुरू केली आहे. परंतु समाजात अशा घटनांचा प्रसार रोखण्यासाठी योग्य कारवाई होणे आवश्यक आहे, अन्यथा अशा धमक्या आणि हल्ल्यांमुळे समाजातील महिलांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -