मुंबई: मनुष्याला जगण्यासाठी ऑक्सिजन आणि पाण्याची गरज असते. याशिवाय माणसाला जगण्यासाठी आणखी काही गोष्टींची गरज पडते. जसे माणसाच्या शरीरातील सर्व भाग चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी चांगली झोप घेणे आवश्यक आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का की जर एखादी व्यक्ती बराच काळ झोपली नाही तर त्यांच्या शरीराची स्थिती काय होईल.
मनुष्याची झोप
कोणत्याही व्यक्तीच्या शरीरासाठी झोप ही अतिशय गरजेची आहे. कारण जेव्हा व्यक्ती झोपके तेव्हा त्याची बॉडी चार्ज होते. एका व्यक्तीला दिवसभरातून कमीत कमी ६ ते ८ तासांची झोप घेणे गरजेचे असते. मात्र एक व्यक्ती रेकॉर्ड बनवण्यासाठी तब्बल १२ दिवस झोपला नव्हता. एक यूट्यूबर सर्वाधिक दिवस जागे राहण्याचा रेकॉर्ड बनवण्यासाठी १२ दिवसांपर्यंत झोपला नव्हता. लाईव्ह स्ट्रीमिंग केली होती. दरम्यान, त्या व्यक्तीचे काही मोठे नुकसान झाले नव्हते मात्र त्याच्या शरीरात अनेक बदल घडले होते.
किती दिवस जागे राहू शकतो व्यक्ती
ऑस्ट्रेलियाच्या यूट्यूबर नॉर्मेने सलग १२ दिवस जागत वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा रेकॉर्ड बनवू शकला नव्हता. या दरम्यान नॉर्मेला अनेक त्रास सहन करावे लागले होते. मात्र गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने काही दिवसांआधीच अधिकृत विधान जारी करत सांगितले होते की ते या पद्धतीच्या कोणत्याही कामाला अधिकृतपणे मान्यता देणार नाही. यात धोका असू शकतो. गिनीज बुकच्या टीमच्या मते झोप ही माणसासाठी आवश्यक आहे. अशा पद्धतीचे रेकॉर्ड धोका निर्माण करू शकतात.
झोप घेणे गरजेचे
प्रत्येक व्यक्तीला ६ तासांची कमीत कमी झोप घेणे गरजेचे असते. तज्ञांच्या मते ज्या लोकांची झोप पूर्ण होत नाही त्यांना दुसऱ्या दिवशी थकवा, सुस्ती, कामात मन न लागणे या समस्या सतावतात. तसेच रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. विचार करण्याची समस्या, वजन वाढण्याचा धोका राहतो. याशिवाय डायबिटीजचा धोकाही वाढतो. याशिवाय कॅन्सरसारखे घातक आजार होण्याचा धोकाही वाढतो.