नुकतीच घडलेली ही घटना मनाला हुरहुर लावून जाण्यासारखी आहे. एका मुलाने व्हीडिओ गेममधील टास्क पूर्ण करताना उंच इमारतीवरून उडी मारली. ही घटना सगळ्या पालकांना हादरवून टाकणारी आहे. अजून पुरेसे जगही ज्याने पाहिले नाही, पण व्हीडिओ गेम्सच्या विळख्यात अडकलेल्या त्या अर्ध्यामुर्ध्या वयाच्या जीवाचा अंत झाला हे खरोखरच खूप भयंकर आहे. विचार करायला लावणारे आहे.
एकेकाळी मुले दूरदर्शनवर कार्टून्स पहायचे. रामायण, महाभारत पहायचे. हळूहळू मुले व्हीडिओ गेम्स खेळायला लागले. जे अगदी प्राथमिक पातळीवरचे होते. नंतर त्यात लेव्हल अचीव्हिंग, पर्कस्, गिफ्ट्स सुरू झाले. मात्र आत्ता मुले ज्याप्रकारचे व्हीडिओ गेम्स खेळताहेत त्यातून मुलांमधील आक्रमकता, डिस्ट्रक्टिव्ह नेचर तयार होत आहे. मुले दिवसातले बरेच तास मोबाइलवर खेळत असतात. खोलीचे दार लावून घेतात. दात घासत नाहीत, आंघोळ करत नाहीत. अभ्यास किंवा मैदानी खेळ तर खूप लांबची गोष्ट.
यातूनच मुलांचे अभ्यासाचे प्रश्न, भावनिक स्वास्थ्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. यातून त्यांच्या इंटेलेक्चुअल विकासावरही परिणाम होतोय. अशावेळेस पालक अक्षरशः हतबल होतात. मुलांना असे ॲडिक्ट झालेले पाहणे आणि त्यातून कसे त्यांना बाहेर काढावे ही गोष्ट त्यांच्यासाठी खूप स्पर्धात्मक झाली आहे. मुलांचे व्हीडिओ गेम्स ॲडिक्शनचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जात आहे. रोज किमान दोन तास ते पूर्ण दिवस मुले व्हीडिओ गेम्स खेळतात. मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण व्हीडिओ गेम्स खेळण्यात अधिक आहे. यालाच ‘इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर’ IGD म्हणतात. ही एक मेंटल हेल्थ डिसऑर्डर होत जाते.
इतर बाकी ॲडिक्शनप्रमाणेच या ‘गेमिंग ॲडिक्शन’ मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टीमला ट्रिगर करते म्हणजेच खेळताना जिंकलो की, जी भावना मुलांच्या मनात निर्माण होते ती भावना ट्रिगर होते. मुलांच्या भावनांचा कल्लोळ सुरू होतो. या ॲडिक्शनमधून मुलांमध्ये डिप्रेशन आणि ॲन्क्झायटी निर्माण होत जाते. या वयात मुलांचे पालकांशी असलेल्या नात्यात दुरावा निर्माण होतो. त्यामुळे मुले इंटरनेट वापरण्यात जास्त वेळ घालवतात. आयुष्यातील प्रॉब्लेम्स सोडविण्याची स्ट्रॅटेजी म्हणून जणू ते गेमिंग करतात. तर काही वेळेस वास्तवापासून पळ काढण्यासाठी गेमिंग केले जाते. ताण आणि डिसकम्फर्ट जाणवू नये या मानसिकतेतून गेम्स खेळले जातात. मुलांचा मेंदू अजून पूर्ण विकसित झालेला नसतो. त्यामुळे ते या ॲडिक्शनला लवकर बळी पडतात. या टीनएजर्सची तणावपूर्ण, अवघड परिस्थितीशी जुळवून घेण्याची पातळी, अनुभव घेण्याची क्षमता इतकी खालावलेली असते की, आपल्या भावना दडवून ठेवण्यासाठी ते प्रचंड राग व्यक्त करतात. मुले जास्त रिस्क घेतात. मुलांमध्ये craving अर्थात मोहाची भावना, रिवॉर्ड प्राप्त करण्याची इच्छा आणि हरण्याची संवेदनशिलता गेमिंगबाबत जास्त तीव्र असते. हा एक बिहेवियरल प्रॉब्लेम आहे.
१)मुले जास्तीतजास्त वेळ गेमिंगमध्ये घालवतात.
२) सतत चिडचिड असते. गेम्स काढून घेतले तर ॲनक्झायटी दिसते. त्यांची झोप कमी होत जाते. कारण हा व्हीडिओ गेम्सचा नाद.
३)मुले दिवस दिवस स्वतःला खोलीत कोंडून घेतात.
४) इतर काहीही करण्यात, घरातील गोष्टी करण्यातील त्यांचा रस संपलेला असतो. गेम्स खेळण्याच्या वेळेबाबत ते आईवडिलांशी खोटे बोलतात, फसवतात.
५) मनातील चिंता,अपराधीपण आणि नकारात्मक भावना लपवण्यासाठी ते गेम्स खेळतच राहतात.
६) ते गेम्स खेळण्याचा वेळ, सारखं सारखं खेळणे ते कमी करू शकत नाहीत. तुम्ही गेम्स खेळणे थांबवायला सांगितले की, टॅन्ट्रम्स् दाखवतात. आरडाओरडा, वस्तू फेकणे, दारं आपटणे तर कधी अंगावर धावून येणे हेही घडू शकते.
७) सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स निर्माण झाले तरी ते स्वतःला या ॲडिक्शनपासून थांबवू शकत नाहीत.
८) अभ्यासातील प्रगती ढासळत जाते.
१) त्यांना सकारात्मक कामे करायला प्रवृत्त करा. रोज संपूर्ण कुटुंबाने किमान पाच ते दहा पाने वाचायचीच असे ठरवा.
पुस्तक वाचन हवंच, स्वयंपाकातील काही डिश करणं, खेळ, पेंटिंग यासारख्या गोष्टीत गुंतवणं. सारखं काहीतरी रिवॉर्ड मिळवण्याची मेंदूला लागलेली सवय मोडून काढावी लागेल.
२) मुलांचा स्क्रीन टाईम अतिशय कठोरपणे ठरवूनच घ्या. मुलांना फॅन्टसीच्या जगात न जाऊ देता वर्तमानकाळात जगायची सवय लावा. तुमचे त्यांच्या आयुष्यातील स्थान सगळ्यात जास्त जवळचे असल्याने तुम्ही हे अधिक प्रभावीपणे करु शकता.
३) इच्छा झाली, मोह पडला, ताण वाटला तरी मनावर या परिस्थितीतही ताबा ठेवणे कसे आवश्यक आहे ते शिकवा. त्यांना रोजच्या कामात, व्यायामात गुंतवणे, थकवणंही करायलाच हवंय.
४) आपण स्वतःही फोनचा वापर एकदम कमी करा. तुमच्या चांगल्या सवयींचे ते अनुकरण करत असतात.
५) झोपण्याची, जेवणाची, मनोरंजन,अभ्यास, व्यायाम यांचे कठोर नियोजन हवेच. संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक मुलांच्या सोबतीने ठरवा.
६) मुलांशी संवाद साधून व्हीडिओ गेम्स ॲडिक्शनचे दुष्परिणाम स्पष्ट भाषेत जरुर सांगा. तुम्ही जर सांगितले नाहीतर त्यांचे गांभीर्य मुलांना कळणार नाही. यातून मानसिक आरोग्य बिघडेल, ताण वाढतो,ॲन्क्झायटी येते, झोप कमी होते, अभ्यास घसरतो, शारीरिक तब्येत बिघडते, आक्रमक वागणे सुरु होते, सेल्फ एस्टीम खालावतो हे सारे मुलांना बसवून सांगाच.
७) व्हीडिओ गेम्सच्या ऐवजी दुसरा प्रॉडक्टिव्ह पर्याय मुलांना द्यायला हवा. क्रिएटिव्ह गोष्टी जसे की, गार्डनिंग, विणकाम, शिवण, ड्रेस डिझाईनिंग, कुकिंग, बुद्धिबळ, स्पर्धा परीक्षा, मैदानी खेळ, स्विमिंग, वाद्यवादन, गायन सायकलिंग, योगासने, स्केटिंग यात त्यांना गुंतवता येईल. यासाठी मुलांच्या वागण्याचे काळजीपूर्वक निरीक्षण करणे आवश्यक आहे. मुले यात अडकायला लागली असतील तर ताबडतोब प्रोफेशनल मदत घ्याच. गोष्टी हाताबाहेर जाण्याची वाट नका बघू.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…