Wednesday, March 26, 2025
Homeताज्या घडामोडीTelegram CEO Arrest : टेलिग्रामचे सीईओ पावेल डुरोव यांना फ्रान्समधून अटक, हे...

Telegram CEO Arrest : टेलिग्रामचे सीईओ पावेल डुरोव यांना फ्रान्समधून अटक, हे कारण आले समोर

पॅरिस: टेलिग्राम मॅसेजिंग (Telegram) ॲपचे अब्जाधीश संस्थापक आणि सीईओ पावेल डुरोव (Pavel Durov ) यांना फ्रान्स पोलिसांनी अटक केली आहे. पॅरिस विमानतळावर उतरताच पावेल डुरोव यांना अटक करण्यात आली. शनिवारी संध्याकाळी पॅरिसच्या जवळ असलेलं बॉर्गेट विमानतळावर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ते स्वतःच्या खासगी जेटने पॅरिस येथे आले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर ही कारवाई केली. पावेल डुरोव हे अजरबैजान या देशातून फ्रान्समध्ये पोहचले होते. टेलिग्रामने त्यांच्या या अटकेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

टेलिग्राम मेसेजिंग ॲपचा पण एक मोठा वर्ग इतर समाज माध्यमांप्रमाणेच जगभर पसरलेला आहे. या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर अनेक जण आहेत. काही वर्षांपूर्वी भारतात व्हॉट्सॲप बॉयकॉटची टीम आली होती. त्यावेळी टेलिग्राम हे ॲप भारतीय असल्याचा खोटा प्रचार पण करण्यात आला होता. डुरोव हे दुबईत स्थायिक झाले आहेत. ते मुळत: रशियनचे आहेत. त्यांनी 2014 मध्येच रशियारशिया सोडलं होत.

का केली अटक

फ्रान्समधील मीडियानुसार, डुरोव यांना टेलिग्राम ॲप संबंधी एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे. टेलिग्रामवर त्यांचे नियंत्रक नसल्याचे फ्रान्स सरकारचे म्हणणे आहे. या ॲपच्या माध्यमातून फ्रान्समध्ये काहीतरी गुन्हेगारी कृत्य घडल्याचा ठपका आहे. तेव्हापासून फ्रान्स सरकारने या ॲपच्या घडामोडीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. या मॅसेजिंग ॲपवर नियत्रंक नसल्याने गुन्हेगारी घडामोडीत त्याचा वापर जास्त प्रमाणात वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रशियाची भूमिका काय?

टेलिग्रामतर्फे या कारवाईनंतर पावेल यांच्यावरील अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. तर दुसरीकडे फ्रान्स सरकार तसेच तेथील पोलिसांनाही यावर काहीच स्पष्टीकरण दिलेले आहे. मात्र रशियाने या कारवाईवर भूमिका घेतली आहे. नेमकं काय घडतंय, सध्याची स्थिती काय आहे, जे जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे रशियाने म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -