Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडी२९ ऑगस्टला येत आहे Realme 13 5G Series, मिळणार पॉवरफुल प्रोसेसर

२९ ऑगस्टला येत आहे Realme 13 5G Series, मिळणार पॉवरफुल प्रोसेसर

मुंबई: स्मार्टफोन निर्माता कंपनी रिअल मी लवकरच आपला नवा स्मार्टफोन लाँच करत आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला अनेक शानदार फीचर्ससोबत दमदार प्रोसेसरही पाहायला मिळत आहेत. खरंतर रिअल मी 13 5G Series ला कंपनी २९ ऑगस्टला भारतीय बाजारात लाँच करत आहे. यासोबतच पॉवरफुल प्रोसेसरसोब लाँच केले जाऊ शकते.

मिळणार पॉवरफुल प्रोसेसर

मिळालेल्या माहितीनुसार कंपनीकडून एक्सवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये हा स्मार्टफोन दोन रंगात दाखवण्यात आला आहे. तर या स्मार्टफोनची लाँच डेट आणि प्रोसेसरबद्दली माहिती देण्यात आली आहे.

रिअलमी चा हा स्मार्टफोन फास्टेस्ट डायमेंसिटी 7300 Energy चिपसेट प्रोसेसरसोबत लाँच केला जाईल. ई कॉमर्स फ्लिपकार्ट वर Realme 13 5G Series च्या लँडिंग पेजवर फोनबाबतची माहिती देण्यात आली आहे. कंपनीनुसार हा स्मार्टफोन पॉवरफुल चिपसेटसह पॉवरफुल चार्जिंग आणि शानदार मेमरीसोबत बाजारात लाँच होईल.

रिअलमी १२ सीरिज

याआधी कंपनीने आपला Realme 12 5G Series स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये लाँच केली होती. या कंपनीने यावर्षी ६ मार्चला उतरवले होते. या मालिकेत कंपनीने Realme 12 5G आणि12+ 5G हे फोन उतरवले होते. याची किंमत अनुक्रमे १६,९९९ रूपये आणि १९,९९९ रूपये आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -