Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीPayavatachi Savali Upcoming Marathi Movie: 'पायवाटाची सावली' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, चित्रपटाची उत्सुकता...

Payavatachi Savali Upcoming Marathi Movie: ‘पायवाटाची सावली’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, चित्रपटाची उत्सुकता शिगेला

लेखकाचा खडतर प्रवास पायवाटाची सावली या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतच मान्यवरांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत पार पडला. या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते, लेखक, मुन्नावर शमिम भगत, बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध संगीतकार अनिल बिस्वास यांचे सुपुत्र अमित अनिल बिस्वास, मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक शिरीष राणे, या चित्रपटाचे वितरक अकात डिस्ट्रीब्यूशनचे संस्थापक चंद्रकांत विसपुते ह्या सर्व मंडळींनी उपस्थिती लावली होती. १३ सप्टेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.

लेखकाच्या खऱ्याआयुष्यामधील खडतर प्रवास या चित्रकथेतून मोठ्या पडदयावर पाहायला मिळणार आहे. जीवनातील कठीण परिस्थितीशी त्याने दिलेली झुंज या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये पाहायला मिळत आहे. तसेच यात एका सुंदर गावातील जीवनशैली आणि साध राहणीमान ट्रेलर मध्ये दिसून येत आहे.

प्रस्तुत ‘पायवाटाची सावली’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची व लिखाणाची धुरा मुन्नावर शमीम भगत यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू ‘मीना शमीम फिल्म्स’ने सांभाळली आहे. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत अमित अनिल बिस्वास यांनी केले आहे. या चित्रपटात विजे भाटिया, शाल्वी शाह, रेवती अय्यर, प्रसाद माळी आणि शीतल भोसले हे कलाकार आहेत.

या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक – लेखक मुन्नावर शमीम भगत यांनी त्यांचा अनुभव शेअर करत अस म्हटलं की, “एका गावात अनेक वर्ष पाऊस पडलेला नसतो. तेथील लोक पाण्यविणा आपला उदरनिर्वाह कसा करतात. त्यांची पाण्यप्रतीची तळमळ या चित्रपटात रेखाटली आहे. आयुष्यात हरलेला व स्वतःला निराशेच्या डोहात बुडवलेल्या एका लेखकाची दुर्दशा यात मांडली आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाचा ट्रेलर नक्की आवडेल अशी मी आशा करतो. तसेच काहींना अस वाटेल की हे माझ्यासोबत देखील घडल आहे. काहीना आपल्या खऱ्या आयुष्याच्या वास्तवाची देखील प्रचिती होईल. सर्वांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन एकदा तरी नक्की पहावा अशी मी आशा करतो.”

https://youtu.be/LT-gF5m3HMI?si=RhaQM_SL-6DwFV2v

बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध संगीतकार अनिल बिस्वास यांचे सुपुत्र अमित अनिल बिस्वास यांचे या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण झाले त्याविषयी ते सांगतात.”माझे मित्र मुन्नावर शमीम भगत यांनी माझ्यावर या चित्रपटाच्या संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी दिली. तेव्हा मला फार आनंद झाला. कारण माझे वडील अनील बिस्वास यांनी हिंदी संगीतसृष्टीत खूप उत्तम काम केलं आणि मी आता त्यांच्या संगीताचा वारसा पुढे नेत आहे यात मला आनंद आहे. या चित्रपटातील गाणी सुंदर झाली आहेत. तुम्ही सर्वांनी हा चित्रपट १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -