भारतीय पदार्थ हे मसाल्यांशिवाय अपूर्ण आहेत, म्हणूनच भारतीय पदार्थांमध्ये तेल आणि मसाल्यांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो.
मात्र, सतत अशा पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात केल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. बऱ्याचदा जेवण बनवताना तेल आणि मसाले अधिक वापरल्याने पदार्थांची चवदेखील खराब होते.
जास्त प्रमाणात मसाल्याचे सेवन केल्याने वजनही मोठ्या प्रमाणात वाढू शकते. सर्वाधिक तेलकट आणि मसाल्याचे पदार्थ खाल्ल्याने लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच त्याचा गंभीर त्रास होऊ शकतो.
तळलेल्या पदार्थांमध्ये खूप कॅलरीज असतात. यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते आणि शरीरात चरबीचे प्रमाण जास्त वाढू शकते.
जर तुम्ही तळलेले अन्नपदार्थ खाण्याची सवय वेळेवर नियंत्रित केली नाही तर यामुळे तुम्हाला लठ्ठपणादेखील येऊ शकतो.
एखादी व्यक्ती दररोज तळलेले अन्न खात असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरात टाइप २ मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
मसालेदार पदार्थांमुळे यकृताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, ज्यामुळे यकृताचा सिरोसिस होऊ शकतो.
सतत मसालेदार अन्न खाल्ल्याने तुमचे पोट खराब होऊ शकते, किंवा अॅसिडिटी हौस शकते आणि यामुळे लूज मोशन, उलट्या होणे अशा समस्यादेखील निर्माण होऊ शकते.
जास्त तेल आणि मसाले असलेल्या पदार्थातील तेल यकृतात अडकते आणि यामुळे यकृतामध्ये चरबी जमा होऊ लागते, ज्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते.