Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडीEco Friendly Ganesha : नेरळचे जोशी साकारतात पर्यावरण पूरक शाडू मातीचा गणपती!

Eco Friendly Ganesha : नेरळचे जोशी साकारतात पर्यावरण पूरक शाडू मातीचा गणपती!

४८ वर्षांपासून जोपासतात आगळावेगळा छंद

कर्जत : नेरळ (Neral) येथील वृत्तपत्र विक्रेते असलेले बल्लाळ जोशी यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून स्वतःच्या हाताने पर्यावरण (Environmental) पूरक शाडूच्या माती (Shadu Soil) पासून गणेश मूर्ती (Ganesh Idol) घडविण्याची परंपरा आजही कायम ठेवले आहे. जोशी गेली ४८ वर्ष गणेशा प्रती असलेली ही सेवा अविरत करत आहेत. आपल्या व्यवसायाला साजेस असे काम करताना बाप्पाची मूर्ती घडविताना त्यांनी एकदा चक्क कागदाच्या लगदा वापरून गणेश बाप्पाची मूर्ती साकारली होती.

नेरळ या मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकात अनेक वर्ष वृत्तपत्र विक्री करण्याचा व्यवसाय करणारे बल्लाळ जोशी हे व्यवसायातून वेळ काढून आपला छंद देखील जोपासत असतात.राजकारण तसेच भजनाचीही त्यांना आवड असल्याने आपले हे सर्व छंद जोपासत गणेश उत्सवासाठी जोशी हे आपल्या घरचा बाप्पा स्वतःच घडवतात.

वयाच्या आठव्या वर्षापासून मूर्ती बनवण्याची सुरुवात

गणेशोत्सवासाठी शाडूच्या मातीपासून बाप्पाची मूर्ती स्वतः बनवण्यास त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून सुरुवात केली. साधारण १५ इंच उंचीची सिंहासनाधीष्ट असा बाप्पा आपल्या व्यवसायातून वेळ काढून बनवतात. पाच वर्षांपूर्वी त्यांनी कागदाच्या लगातापासून बाप्पाची इको फ्रेंडली मूर्ती साकारली होती. वृत्तपत्र विक्रेते म्हणून आपल्या व्यवसायात आढळ स्थान कायम ठेवणारे जोशी यांचा हा आगळा वेगळा छंद पर्यावरण रक्षणासाठी निश्चितच महत्त्वाचा मानला जात आहे.

श्रावण महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ते आपल्या घरचा गणपती साकारायला सुरुवात करतात. सर्वप्रथम खांद्यावर शेला, पितांबर, इवल्याच्या हातात वाळा, अंगावर आभूषणे असा साधारण बाप्पा साकारतात तर दुसरीकडे बैठकही कोरीव काम करून साकारली जाते. सुंदर कोरीव काम केलेले लोड तक्के यांनी बैठक सजवली जाते मग इवलेसे उंदीर मामा वाहन म्हणून स्थानपन्न होतात सर्वात शेवटी मुकुटमणी साकारायचे काम सुरू होते मूर्तीला साजेशे अशी सजावट हिरे माणिक मोती यांनी केली जाते एका हाताने भक्तांना वरदान देत असलेला आणि दुसऱ्या हाताने मोदक घेणारा असा बाप्पा जोशी बनवतात. मूर्तींचे मूर्तीचे अतिशय काळजीने केलेले आखीव रेखीव काम डोळ्याचे पारणे फेडते. नंतर जोशी हे आपल्या बाप्पाला कुंभार वाड्यात नेऊन रंगकाम करून घेतात.

दरम्यान, कोविड काळात त्यांनी कल्याण येथील गुरुकृपा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सतत दोन वर्षे कार्यशाळेतून शाडूच्या मातीची गणेश मूर्ती साकारण्याचे धडे दिले होते.त्यावेळी येथील विद्यार्थ्यांनी आपल्या हातून छान गणेश मूर्ती साकरल्याचे जोशी यांनी सांगितले.

शाडूमातीच्या मूर्तीच वापरण्याचे आवाहन

पिओपी (POP) पेक्षा शाडूच्या मातीची मूर्ती ही पर्यावरण पूरक असून मूर्ती विसर्जन केल्यावर पूर्णपणे पाण्यात विरघळून जाते तसेच पाणीही दूषित होत नाही. त्यामुळे पर्यावरण पूरक अशा मूर्ती आणि सजावट साकार करून गणेश उत्सव साजरा करावा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -