ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि ठाणे आणि कल्याण संपर्क प्रमुख खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी परिसरातील अष्टविनायक चौकात शिवसेना कोपरी विभागाच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात एकूण १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षिसे देण्यात येणार आहेत. मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या दहीहंडी सोहळ्याला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे त्याचबरोबर कोपरी पाचपाखाडी विधानसभा शहर प्रमुख राम रेपाळे आणि ठाणे जिल्हा महिला संघटक मिनाक्षी शिंदे सुद्धा उपस्थित राहणार आहेत अशी माहिती शिवसेना कोपरी पदाधिकारी , महिला पदाधिकारी आणि युवा सेनेचे पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आली आहे.
कोपरी परिसरातील अष्टविनायक चौकात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यंदाचे उत्सवाचे ३ रे वर्ष असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. यंदा मुंबई-ठाण्यासाठी एक दहीहंडी, महिलांसाठी दहीहंडी आणि कोपरीकरांसाठी एक हंडी अशा तीन हंड्या येथे उभारल्या जातात. आठ थरांसाठी २१ हजारांचे रोख पारितोषिक तसेच सन्मानचिन्ह तर साथ थरांची ११ हजार रुपये सहा थरांसाठी ६००० पाच थरांसाठी ५००० आणि चार थरांसाठी ३००० लावणाऱ्या गोविंदा पथकांना एकुण १ लाख ११ हजार एकशे एकरा रुपयांचे रोख पारितोषिके तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय स्थानिक गोविंदांना तसेच महिलावर्गासाठी आणि उत्तेजनार्थ पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.
गोविंदा पथकांच्या सुरक्षिततेसाठी सेफ्टी बेल्ट, रुग्णवाहिका, आणि डॉक्टर्स तैनात असणार आहेत . दहीहंडी सोहळ्यासाठी, दिवसभर मनोरंजनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. यंदा या दही हंडी सोहळ्याला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असुन शिवसेनेचे आमदार आणि सर्वपक्षीय नेत्यांबरोबरच मराठी सिनेनाटय कलाकारांची उपस्थिती हे या दहीहंडी उत्सवाचे खास आकर्षण असणार आहे. अशी माहिती उपशहर प्रमुख प्रकाश कोटवानी , विभागप्रमुख संतोष बोडके आणि प्रशांत पाटील यांनी यावेळी दिली.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…