Sunday, July 6, 2025

काव्यरंग: त्या तिथे, पलीकडे

काव्यरंग: त्या तिथे, पलीकडे
त्या तिथे, पलीकडे, तिकडे
माझिया प्रियेचे झोपडे !

गवत उंच दाट दाट
वळत जाइ पायवाट
वळणावर आंब्याचे
झाड एक वाकडे

कौलावर गारवेल
वाऱ्यावर हळु डुलेल
गुलमोहर डोलता
स्वागत ते केवढे !

तिथेच वृत्ति गुंगल्या
चांदराती रंगल्या
कल्पनेत स्वर्ग जो
तिथे मनास सापडे

गीत - ग. दि. माडगूळकर
गायक - मालती पांडे

चांदण्यात फिरताना


चांदण्यात फिरताना माझा धरलास हात !
सखया रे, वर ही सावर ही चांदरात !

निजलेल्या गावातून
आले मी एकटीच;
दूर दिवे कळलावे
पडले मागे कधीच;
या इथल्या तरूछाया पण सारे जाणतात !

सांग कशी तुजविणाच
पार करू पुनवपूर?
तुज वारा छळवादी
अन् हे तारे फितूर !
श्वास तुझा मालकंस !
स्पर्श तुझा पारिजात !

जाऊ चल परत गडे,
जागले न घर अजून
पण माझी तुळस
तिथे गेली हिरमुसून
तुझिया नयनात चंद्र,
माझ्या ह्रदयी प्रभात

गीत - सुरेश भट
गायिका - आशा भोसले
Comments
Add Comment