मुंबई: २६ ऑगस्टला जन्माष्टमीचा सण साजरा केला जात आहे. काही लोकांना माहीत नसते की या जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाच्या कोणत्या रूपाची पुजा केली पाहिजे. ज्योतिषांच्या माहितीनुसार आपल्या मनोकामनांच्या आधारावर कृष्णाच्या प्रतिमेची निवड केली पाहिजे. धन अथवा संतान सुख या सगळ्यांसाठी वेगळ्या स्वरूपाची पुजा केली पाहिजे.
जर तुम्हाला आर्थिक तंगी जाणवत असेल तर जन्मानष्टमीला श्रीकृष्ण आणि कामधेनु गायीची प्रतिमा स्थापन करून विधीवत पुजा करा.
जर तुम्हाला आयुष्यात मोठे यश मिळवायचे असेल तर श्रीकृष्णाच्या भागवत गीतेच्या स्वरूपाची पुजा करा.
जर तुम्हाला मुलांशी संबंधित समस्या आहेत तर जन्माष्टमीला घरी श्रीकृष्णाच्या लड्डूगोपाल अथवा बालगोपाळाच्या प्रतिमेची स्थापना करा.
जर एखाद्या समस्येपासून सुटका होत नसेल तर जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या गिरीराज स्वरूपाची वंदना करा.
जर तुम्हाला करिअरमध्ये वाढ आण दाम्पत्य जीवन सुखी हवे असेल तर श्रीकृष्णाच्या द्वारका स्वरूप प्रतिमेची पुजा करा.