Monday, March 24, 2025
Homeताज्या घडामोडीAssembly Election 2024 : विधानसभेच्या विजयासाठी भाजपाची रणनीती! वापरणार 'हा' नवा फॉर्म्युला

Assembly Election 2024 : विधानसभेच्या विजयासाठी भाजपाची रणनीती! वापरणार ‘हा’ नवा फॉर्म्युला

मुंबई : सध्या राज्यभर विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election) वारे वाहू लागले आहेत. सर्व राजकीय पक्ष जय्यद तयारी करत आहेत. अशातच महायुतीकडूनही (Mahayuti) भाजपाचेच (BJP) सरकार पुन्हा निवडून येण्यासाठी नवीन रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा जिंकण्यासाठी भाजपा वारंवार बैठकी घेत आहे. दोन दिवसांपूर्वीच नागपूर शहरात बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर उद्या देखील मुंबईत भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा कोणत्या रणनीतीचा वापर करणार आहे, याबाबत चर्चेचे उधाण आले होते. परंतु आता चर्चेला पूर्णविराम मिळाला असून भाजपाच्या रणनीतीचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा जिंकण्यासाठी भाजपा पक्ष विधानसभा मतदारसंघ असा फोकस न करता पंचायत समिती सर्कल फोकस करून प्रचारयंत्रणा, संपर्कयंत्रणा राबविणार आहे. तसेच पक्षातील गटबाजी करणाऱ्या नेत्यांना महत्त्व दिले जाणार नसून अनुभवी व्यक्तींना अधिक जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर नेत्यांपेक्षा कार्यकर्ता हा बेस असून अन्य राज्यातील मोठ्या नेत्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे फॉर्म्युला?

१५-३००-१५०- ४५००

  • आतापर्यंत निवडणुकीत भाजपच्या दृष्टीने बूथप्रमुख हा महत्त्वाचा घटक असायचा. बूथप्रमुखांची रचना कायम ठेवली जाणार असली तरी त्याला समांतर एक वेगळी रचना आता करण्यात आली आहे.
  • राजकीय समज एकदम पक्की असलेल्या १५ जणांची एक टीम प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तयार केली जात आहे.
  • त्यात निवडणुका जिंकण्याचा, लढण्याचा अनुभव असलेले स्थानिक नेते आणि इतर जाणकार प्रमुख कार्यकर्ते, नेते असतील. हे टूलकिट क्रमांक एक असेल. या १५ जणांपैकी प्रत्येक जण ३०० जणांची टीम तयार करेल, हे टूलकिट क्रमांक २ असेल.
  • हे ३०० जण मग प्रत्येकी १५० या प्रमाणे ४५ हजार जणांच्या टीम तयार करतील. हे सगळे जण एका ॲपवर जोडले जातील आणि ते सातत्याने एकमेकांच्या संपर्कात असतील.
  • बूथप्रमुख पक्षासाठी कष्ट खूप करतो. पण लोकांना प्रभावित करणे, त्यांना पक्षाकडे खेचून आणण्याबाबत तो कमी पडतो हे लक्षात आल्यानंतर आता ही वेगळी रचना करण्याचे ठरले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कमीत कमी १५०० महिलांच्या उपस्थितीत १५ मेळावे घेण्यात येणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -