मुंबई: एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी नेहमी काही ना काही प्लान साजर करतात. एअरटेल भारत विविध भागांमध्ये आपतग्रस्त पीडित लोकांसाठी काही खास ऑफर सादर करत असते. खरंतर, एअरटेलने काही पीडित लोकांसाठी १.५ जीबी डेटा आणि कॉलिंगचे फायदे फ्रीमध्ये देण्याची घोषणा केली आहे.
भारताच्या पूर्वोत्तर राज्ये म्हणजे मणिपूर, मिझोरम, मेघालय आणि त्रिपुरा मधील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसामुळे लोकांचे जनजीवन व्यस्त झाले आहे. अनेक लोकांचे यात बळीही गेले आहेत. या कारणाने एअरटेलने या भागांमध्ये पीडित लोकांना दिलासा देण्यासाठी काही खास ऑफर्स सादर केले आहेत.
एअरटेलने १.५ जीबी डेटा आणि कॉलिंगची सुविधा मोफत देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय एअरटेलने पोस्टपेड ग्राहकांसाठी दिलासा देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने पोस्टपेड ग्राहकांसाठी बिल भरण्याची शेवटची तारीख ३० दिवसांसाठी पुढे वाढवले आहे. याचा अर्थ आहे की एअरटेलच्या पोस्टपेड युजर्स आपला बिल भरणा ३० अतिरिक्त दिवसांमध्ये करू शकतील.
एअरटेलच्या या ऑफरच्या कारणामुळे लोक रिचार्जचे टेन्शन न घेता इंटरनेटच्या माध्यमातून जोडले जाऊ शकतात. प्रीपेड ग्राहकांसाठी ही सुविधा ४ दिवसांसाठी उपलब्ध असेल.
नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईचा वीजवापर ‘४००० मेगावॅट’ पार! तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी मुंबई : राज्यातील उष्णतेच्या…
शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान…
तुर्कस्तान : तुर्कस्तानमध्ये (तुर्कीये किंवा टर्की) भूकंपामुळे जमीन हादरली. जर्मन भूगर्भतज्ज्ञांनी तुर्कस्तानमध्ये ६.२ रिश्टर क्षमतेचा…
चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) सातत्याने नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक…