आमदार नितेश राणे यांना न्यायासाठी साकडे
नाशिक : नाशिक सिन्नर येथील टोल प्लाझाच्या सर्व कर्मचारी वर्गाने आमदार नितेश राणे अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेत प्रवेश केला. संघटना सरचिटणीस प्रवीण नलावडे यांनी मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातुन संघटना कार्यान्वित झाल्याचे पत्र व्यवस्थापनास दिल्यानंतर कामगार संघटना फलकाचे औपचारिक उद्घाटन संघटना उपाध्यक्ष बाळा कसालकर यांच्या हस्ते करण्यात आले.
व्यवस्थापन अधिकारी दीपक वैद्य, नवनाथ केदार यांची भेट घेऊन कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या आणि व्यवस्थापनाकडून होणारी कामगारांची पिळवणूक यावर व्यवस्थानाला निवेदन देण्यात आले, येत्या दहा दिवसात यावर तोडगा काढण्यासाठी व्यवस्थापणास वेळ देण्यात आली आणि कामगारांच्या समस्या न सोडवल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
सदर कार्यक्रमास नाशिक विभागाचे उपचिटणीस दिगंबर गायकवाड योगेश धामणसकर, रणजीत पाटील, स्थानिक युनिट कमिटी सदस्य राम तांबोळे, रोहन मोरे, सागर मोजाड, स्वप्नील साबळे, नितीन ताजनपुरे, गणेश झाडे, महेश तुंगार आणि कार्यकारणी सदस्य अंकेश गुप्ता हे उपस्थित होते.