भावूक व्हिडीओमध्ये म्हणाला…
मुंबई : इंडिया टीमचे (INDIA) दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी आंतरराष्ट्रीय टी-२०मधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी नाराजीचा सूर मारला होता. त्यानंतर आता टीम इंडियामधील आणखी एका क्रिकेटरने निवृत्ती (Retirement) घेतली आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू शिखर धवनने (Shikhar Dhawan) हा निर्णय घेतला आहे. गब्बर म्हणून ओळखला जाणाऱ्या शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याचे सोशल मीडियावरुन जाहीर केले. त्यामुळे भारतीयांना मोठा धक्का बसला आहे.
काय म्हणाला शिखर धवन?
‘मी माझ्या क्रिकेटचा हा अध्याय इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्यासोबत अनेक आठवणी सोबत घेऊन जात आहे. तुमच्या प्रेमासाठी आणि मी घेतलेल्या निर्णयावर मला पाठिंबा दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो असं त्याने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे’.
As I close this chapter of my cricketing journey, I carry with me countless memories and gratitude. Thank you for the love and support! Jai Hind! 🇮🇳 pic.twitter.com/QKxRH55Lgx
— Shikhar Dhawan (@SDhawan25) August 24, 2024
शिखर धवनची कामगिरी
धवन हा एक उत्तम डावखुऱ्या सलामीवीरांपैकी एक होता. धवन भारतीय संघाकडून ३४ कसोटी सामने खेळला असून त्यात त्याने २३१५ धावा केल्या आहेत. ज्यात सर्वोत्तम धावसंख्या १९० इतकी आहे. यामध्ये ७ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये धवनने १६७ सामने भारताकडून खेळले असून त्यात ६७९३ धावा केल्या आहेत. यामध्ये १७ शतके आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे धवनने ६८ टी-२० सामन्यांमध्ये भारताकडून खेळताना १७५६९ धावा केल्या आङेत. यामध्ये ११ अर्धशकतांचा समावेश आहे.