पुणे : पुणे जिल्ह्यातील पौड जवळ आज, शनिवारी एका खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. ही दुर्घटना खराब हवामानामुळे घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पुणे जिल्ह्यातील पौड गावाजवळ आज शनिवारी एक खासगी हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला. हे दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर एका खासगी विमान कंपनीचे आहे. ते मुंबईहून हैदराबादला जात होते. यादरम्यान ते कोसळले. या हेलिकॉप्टरमधून ४ जण प्रवास करत होते.
या दुर्घटनेत कोणी जखमी झाले आहे का? याची माहिती घेतली जात असल्याचे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले. पौड जवळ असलेल्या घोटावडे या ठिकाणी ही भीषण दुर्घटना घडली आहे.
खराब हवामान आणि पाऊस यामुळे हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली आहे.