World Vadapav Day 2024 : तर... असा लागला वडापावचा शोध! मुंबईमध्ये 'या' ठिकाणी मिळतील बेस्ट वडापाव

मुंबई: असं कोणीच नसेल ज्याला वडापाव हा कोणाला आवडत नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य व्यक्ती, मोठ्या पदावर काम करणारा अधिकारी असूदेत किंवा सेलिब्रिटी असो मात्र, वडापावचं नाव जरी घेतलं की कोणालाच खाण्याचा मोह आवरत नाही. मुंबई आणि मुंबईतला वडापाव हे समीकरणंच जगातभारी आहे. बाहेरच्या देशातून मुंबईत येणारा व्यक्ती वडापाव खाल्या शिवाय मात्र परत जात नाही. आपल्या मुंबईच्या रस्त्यावर वडापाव खाण्यासाठी नेहमीच गर्दी पाहायला मिळते. हा वडापाव काही जणांसाठी तर रोजचं जेवण आहे. काहीजण ह्याला नाश्ता म्हणून खातं तर काहीजण वडापाव खाऊन आपली भूक भागवतं. मुंबईमध्ये लोकल आणि वडापाव हे सर्वत्र प्रसिद्ध आहे. मुंबईच्या वडापावाला केवळ मुंबईतच नव्हे तर भारत बाहेरसुद्धा चांगलीच मागणी आहे. आता हीच लोकप्रियता बघून बाहेरच्या देशात सुद्धा वडापाव विकणारे हॉटेल्स सुरु झाले आहेत.


अशातच, या वडापावच्या नावाने अनेक जागा आणि व्यक्ती प्रसिद्ध होताना दिसत आहेत. दिल्लीमध्ये वडापाव विकणारी सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारी वडापाव गर्ल नावानं प्रसिद्ध असलेली चंद्रिका दीक्षितनं (Chandrika Dixshit) वडापाव विकत जगभरात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकताच झालेला बिग बॉस ओटीटी ३ शोमध्ये ती स्पर्धक म्हणून चांगलीच झळकली होती. आणि आज ती वडापाव विक्री करून रोज ४० हजार रुपयांची कमाई करते.


वडापावचा जन्म-

अशोक वैद्य यांनी १९६६ साली दादर स्टेशनच्या बाहेर वडापावचा शोध लावला. त्यानंतर दादरमध्येच सुधाकर म्हात्रें यांनी वडापाव विकायला सुरुवात केली. बटाट्याच्या भाजी बरोबर पोळी खाण्यापेक्षा, बटाट्याच्या भाजीचा गोळा करून तो बेसनाच्या पिठात चांगला घोळवून पावात घालून वडापाव तयार करण्यात आला होता. तेव्हा पासून धावपळीच्या जीवनात खाण्यास सोईस्कर, व्यस्त आणि चवीला अगदी मस्त असणारा हा वडापाव मुंबईकरांना फारच जवळचा वाटू लागला. त्यावेळी एका वडापावची किंमत फक्त १० पैसे इतकी होती. आज वडापाव १० रूपयांपासून ते मॉलमध्ये १०० रूपये आणि मोठ्या हॉटेल्स मध्ये तर अगदी ५०० ते १००० रूपयांपर्यंतही मिळतो.



वडापावचा इतिहास-


वडापावला खरी लोकप्रियता मिळाली ती लालबाग, परेल, दादर आणि गिरगांव येथील मिल मजूरांमुळे. मात्र १९७० ते १९८० च्या आसपासच्या काळात मुंबईमध्ये असणाऱ्या या मिल बंद झाल्या. त्यानंतर रोजगाराचे एक साधन म्हणून अनेकांनी वडापावच्या गाड्या सुरु केल्या. आणि दादरमध्ये सुरू झालेला हा वडापाव मुंबईच्या गल्लीगल्लीत दिसायला लागला. या काळामध्ये दक्षिण भारतीयांच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन छेडले होते. म्हणून अनेक शिवसैनिकांनी दक्षिण भारतीय पदार्थ सोडून वडापाव खाण्यास सुरुवात केली. आज वेगवेगळ्या ठिकाणी वडापाव वेगवेगळ्या पद्धतीने तयार केला जातो.



ही ठिकाणे वडापावसाठी सुप्रसिद्ध आहेत.


मुंबईत कीर्ती कॉलेज जवळचा अशोक वडापाव,
गजानन वडापाव- ठाणे ,
धीरज वडापाव- विले पार्ले
श्रीकृष्ण छबीलदास - दादर
शिवाजी वडापाव- अंधेरी
ग्रॅज्युअट वडापाव- भायखळा
आनंद वडापाव- तळेगाव
जम्बो किंग वडा पाव- परेल
खिडकी वडापाव- कल्याण टिळक चौक
सम्राट वडापाव- सातारा
आराम वडापाव- सीएसएमटी


Comments
Add Comment

दिवाळी आलीये, कमी वेळेत घर करा चकाचक!

मुंबई : सण असो वा रोजची साफसफाई, घर स्वच्छ ठेवल्याने सकारात्मकता आणि उत्साह येतो. बाजारातील महागड्या

मायग्रेन का होतो? आणि त्याचे सुरुवातीची लक्षणे काय आहेत?

मायग्रेन ही एक प्रकारची तीव्र डोकेदुखी आहे जी सामान्य डोकेदुखीपेक्षा वेगळी असते. त्यामुळे डोक्याच्या एका भागात

वारंवार पेनकिलर घेत असाल तर आधी हे वाचा !

मुंबई : थंडीच्या दिवसात हवामानात झपाट्याने होणाऱ्या बदलांचा अनेकांच्या तब्येतीवर परिणाम होतो. अंगदुखी, ताप

झोप न लागण्याची समस्या? या सवयी बदलतील तुमचं आयुष्य!

मुंबई : खरंतर, हल्लीच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे झोपेच्या समस्या खूपच वाढल्या आहेत. चुकीच्या

कार्डिओ व्यायाम करताना या चुका टाळा!

मुंबई : वजन कमी करायचं असो किंवा हृदयाचं आरोग्य राखायचं असो, अनेकजण कार्डिओ हा व्यायाम प्रकार निवडतात. पण अनेकदा

स्वस्त किंवा जुना प्रेशर कुकर वापरताय? तज्ज्ञांचा गंभीर इशारा! आरोग्यासाठी ठरू शकतो मोठा धोका

मुंबई: स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा प्रेशर कुकर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. विशेषतः जर तुमचा कुकर