मुंबई: असं म्हणतात की दिवसाची सुरूवात चांगली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो. आजच्या धावपळीच्या युगात दिवसाच्या सुरूवातीला केला जाणारा ब्रेकफास्ट आपण करत नाही. मात्र ही रोजची सवय बरी नाही. कारण या सवयीमुळे शरीरात पोषकतत्वांची कमतरता येऊ शकते. हळू हळू आपले शरीर आजारांचे घर बनते.
तज्ञांच्या मते सकाळचा नाश्ता केल्याने तुमच्या शरीराला ग्लुकोज मिळते. यामुळे ब्लड शुगर लेव्हल मेंटेन करण्यास मदत होते. तर सकाळचा नाश्ता केला नाही तर शरीरात ब्लड शुगर लेव्हल कमी होते. यामुळे टाईप २ डायबिटीजचा धोका वाढतो.
जर सलग १ महिना तुम्ही सकाळचा नाश्ता केला नाही तर काय होईल घ्या जाणून
चिडचिडेपणा
तज्ञांच्या मते न्यूरोट्रान्समीटर सेरोटोनिन आपला मूड चांगला करण्यास मदत करते. या हार्मोनवर नाश्ता केल्यास चांगला परिणाम होतो. जर आपण एक महिना सकाळची न्याहारी घेतली नाही तर यामुळे चिडचिडेपणा, चिंता तसेच डिप्रेशनची लक्षणेही वाढतात.
वजन वाढणे
सकाळचा नाश्ता जर तुम्ही केला तर वजन कमी होण्याऐवजी ते वाढण्याचा धोका असतो. जेव्हा आपण ब्रेकफास्ट करत नाही तेव्हा आपण लंचमध्ये अधिक खातो. यामुळे वजन वाढू शकते.
मेटाबॉलिक सिंड्रोम
नाश्ता न केल्यास मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका वाढतो. यामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि टाईप २ डायबिटीजचा धोका वाढतो.
टाईप २ डायबिटीज
तज्ञांच्या मते नाश्ता न केल्याने टाईप २ डायबिटीजचा धोका वाढतो. नाश्ता न केल्यास शरीरात ब्लड शुगर कंट्रोल राहत नाही यामुळे डायबिटीजचा धोका वाढतो.
पोषकत्तवांची कमतरता
सकाळचा नाश्ता न केल्यास आवश्यक पोषकतत्वे मिळत नाहीत. जर आपण सकाळचा नाश्ता केला नाही तर आपल्या शरीरात व्हिटामिन, खनिजे, फायबरसारखी पोषकतत्वांची कमतरता होऊ शकते.