Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीन्यायालयाकडून नराधमाला २ महिने २८ दिवसांत फाशीची शिक्षा

न्यायालयाकडून नराधमाला २ महिने २८ दिवसांत फाशीची शिक्षा

सोलापूर : राजस्थानातून सिकंदराबाद येथे जगायला गेलेल्या धोलाराम बिष्णोई या निर्दयी बापानेच १३ महिन्यांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केला होता. त्यावेळी पत्नी पुनिकुमारी हिने साथ दिली. या दोघांनाही फास्ट ट्रॅक कोर्ट नव्हे सोलापूरच्या पोक्सो विशेष कोर्टाचे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी फाशीची शिक्षा ठोठावली. आरोपींना अवघ्या दोन महिने २८ दिवसांत शिक्षा होण्यासाठी जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी अथक परिश्रम घेतले होते.

बदलापूर दुर्घटनेच्या निमित्ताने सोलापूर जिल्हा न्यायालयात सर्वाधिक जलद चाललेल्या या खटल्याची सर्वांनाच आठवण झाली. दारूच्या नशेत जन्मदात्या पित्यानेच १३ महिन्यांच्या मुलीवर अत्याचार केले. ओरडणाऱ्या चिमुकलीच्या तोंडात कापड कोंबून त्याने अत्याचार केले होते. त्यावेळी चिमुकलीच्या आईने देखील बघ्याची भूमिका घेतली. मुलीचा खून करून तिचा मृतदेह घेऊन दोघेही राजकोट-सिकंदराबाद एक्स्प्रेसने राजस्थानच्या दिशेने निघाले होते. पण, रेल्वेच्या त्या डब्यातील एका महिला प्रवाशाने तिच्या जागेवर ठेवलेल्या मुलीला घ्यायला सांगितले. त्यावेळी त्या चिमुकलीचे दोन्ही हात लोंबकळत असल्याने महिला प्रवाशाला संशय आला. त्यांनी प्रसंगावधान साधून तिकीट तपासणीस यांना माहिती सांगितली.

त्यावेळी वाडी स्थानकाशी संपर्क करण्यात आला. तेथून सोलापूर स्थानकावर उतरल्यावर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले व चिमुकलीची वैद्यकीय तपासणी झाली. त्यावेळी ती मृत असल्याचे सांगितले. त्यावरून ४ जानेवारी २०२२ रोजी त्या दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

साधारणत: मार्चअखेर हा खटला न्यायालयासमोर आला. त्यानंतर अवघ्या दोन महिने २८ दिवसांतच या गुन्ह्याचा निकाल लागला व निर्दयी बापासह त्या चिमुकलीच्या आईला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -