Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Special FD: SBI पासून ते IDBI पर्यंत बँकांनी लाँच केली स्पेशल एफडी स्कीम, गुंतवणूकदारांना मिळतेय तगडे व्याज

Special FD: SBI पासून ते IDBI पर्यंत बँकांनी लाँच केली स्पेशल एफडी स्कीम, गुंतवणूकदारांना मिळतेय तगडे व्याज

मुंबई: देशातील अनेक टॉप बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी स्पेशल एफडी स्कीम लाँच केली आहे. आम्ही तुम्हाला याबाबती अधिक माहिती देत आहोत.


गेल्या काही काळापासून बँकांना पडत्या डिपॉझिटच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच देशातील अनेक बँकांनी मर्यादित कालावधीसाठी स्पेशल एफडी स्कीम लाँच केली आहे. आम्ही या स्कीम्सबद्दल सांगत आहोत.


एसबीआयने अमृत वृ्ष्टी स्कीम लाँच केली आहे. या स्कीमचा कालावधी ४४४ दिवसांचा आधी यात सामान्य ग्राहकांना ७.२५ टक्के आणि वरिष्ठ नागरिकांना डिपॉझिटवर ७.७५ टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे. या स्कीमला बँकेने १५ जुलै २०२४ला लाँच केले आहे. अशातच तुम्ही ३१ मार्च २०२४ पर्यंत गुंतवणूक करू शकता.


बँक ऑफ बडोदाने मान्सून धमाका एफडी सादर केली आहे. यात ग्राहकांना ३३३ दिवसांच्या कालावधीवर ७.१५ व्याजदराचा लाभ मिळत आहे. वरिष्ठ नागरिकांना ७.६५ टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे. तर ३९९ दिवसांच्या एफडी स्कीमवर सामान्य ग्राहकांना ७.२५ टक्के आणि वरिष्ठ नागरिकांना ७.४० टक्के व्याजदराचा लाभ मिळतो.


इंडियन बँकेने ३०० ते ४०० दिवसांची स्पेशल एफडी स्कीम लाँच केली आहे. या स्कीमचे नाव आहे Ind Super 300 आणि Ind Super 400 day स्कीम. ३०० दिवसांच्या एफडी स्कीमवर बँकेच्या सामान्य ग्राहकांना ७.०५ टक्के आणि वरिष्ठ नागरिकांना ७.५५ टक्के व्याजदर ऑफर करत आङे. तर ४०० दिवसांच्या स्पेशल एफडी स्कीममध्ये सामान्य ग्राहकांना ७.२५ टक्के आणि वरिष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के व्याजदर ऑफर केले जात आहे. या स्कीममध्ये तुम्ही ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत गुंतवणूक करू शकता.


IDBI Bank नेही अमृत महोत्सव स्कीम लाँच केली आहे. या स्कीमअंतर्गत ग्राहकांना ३७५ दिवस आणि ४४५ दिवसांच्या एफडी स्कीममध्ये गुंतवणुकीची संधी मिळत आहे. ३७५ दिवसांच्या एफडी स्कीमवर बँक सामान्य ग्राहकांना ७.२५ टक्के आणि वरिष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के व्याजदर दिले जात आहे. ४४५ दिवसांच्या स्पेशल एफडी स्कीमवर सामान्य ग्राहकांना ७.३५ टक्के व्याज आणि वरिष्ठ नागरिकांना ७.८५ टक्के व्याजदर मिळत आहे.


आरबीएल बँक एफडी स्कीमअंतर्गत ५०० दिवसांच्या स्पेशल एफडी स्कीम लाँच केली आहे. या स्कीममध्ये सामान्य ग्राहकांना ८.१० टक्के आणि वरिष्ठ नागरिकांना ८.६० व्याजदर ऑफर केले जात आहे.

Comments
Add Comment