Monday, March 24, 2025
Homeक्रीडाNeeraj Chopra: नीरज चोप्राने १४ दिवसांत तोडला ऑलिम्पिकमधील त्याचा रेकॉर्ड

Neeraj Chopra: नीरज चोप्राने १४ दिवसांत तोडला ऑलिम्पिकमधील त्याचा रेकॉर्ड

मुंबई: भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने(neeraj chopra) पुन्हा एकदा कमाल केली आहे. त्याने केवळ १४ दिवसांतच पॅरिस ऑलिम्पिकमधील(paris olympic 2024) त्याचा रेकॉर्ड तोडला आहे. नीरजने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ८९.४५ मीटर थ्रो केला होता. आता लुसाने डायमंड लीगमध्ये त्याने ८९.४९ मीटर दूर भाला फेकत आपला हा रेकॉर्ड मोडला आहे. लुसाने डायमंड लीगमध्ये नीरजने आपला हंगामातील बेस्ट थ्रो केला.

दरम्यान, या बेस्ट थ्रोसह नीरज या लीगमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने पहिले स्थान मिळवले. त्याने ९०.६१ मीटर दूर भाला फेकला. अँडरसन पीटर्स पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिसऱ्या स्थानावर होता. त्याने कांस्यपदक जिंकले होते.तर नीरजने दुसरे स्थान मिळवत रौप्य पदकाची कमाई केली होती.

नीरजने शेवटच्या थ्रोमध्ये केला बेस्ट

लुसाने डायमंड लीगच्या शेवटच्या थ्रोमध्ये नीरजने आपली सर्वोत्तम कामगिरी केली. तो दुसऱ्या स्थानावर राहिला. पहिल्या थ्रोम्ये नीरजने ८२.१० मीटर दूर भाला फेकला. यानंतर दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने ८३.२१ मीटर अंतर गाठले. तिसऱ्या थ्रोमध्ये त्याला ८३.१३ आणि चौथ्यामध्ये ८२.३४ मीटर भाला फेकता आला. यानंतर नीरजच्या पाचव्या थ्रोमध्ये सुधारणा झाली. त्याने ८५.५८ मीटर भालाफेक केला. त्यानंतर सहाव्या आणि शेवटच्या थ्रोमध्ये नीरजने ८९.४९ मीटर भाला फेकत हंगामातील सर्वोत्तम कामगिरी केली.

गाठू शकला नाही ९० मीटरचा आकडा

नीरज चोप्रा पुन्हा एकदा आपल्या करिअऱमध्ये ९०चा आकड्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. नीरज बऱ्याच काळापासून ९० मीटरला टच करण्याचा प्रयत्न करत आहे.मात्र त्यााला अद्याप यश मिळालेले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -