मुंबई: केसांच्या देखभालीसाठी तेल अतिशय गरजेचे आहे. तेल लावल्याने केस मुलायम होतात. त्यांना पोषण मिळते. तेलामुळे केसांची मुळे मजबूत होतात.
मात्र बाजारात भेसळ असलेली तेल येतात. ही तेल वापरल्याने केस गळतीचाही त्रास होतो. जाणून घेऊया तुम्ही घरच्या घरी केसांच्या वाढीसाठी कसे तेल बनवू शकता.
सगळ्यात आधी फ्रेश अॅलोवेरा जेल घ्या. नारळाच्या तेलात हा कोरफडीचा गर शिजवा.
या तेलात तुम्ही कडीपत्ताही टाकू शकता. यात थोडेशे मेथीचे दाणे घाला. त्यात तुम्ही जास्वंदीची फुलेही टाकू शकता.
हे सर्व मिश्रण चांगले एकजीव झाले की थंड झाल्यावर हे तेल गाळून एका बाटलीत भरा.
हे तेल नियमितपणे तुमच्या केसांना लावा. यामुळे केस वाढीसाठी नक्की फायदा होईल. तसेच केसगळीतीही रोखली जाईल.