तमन्ना भाटिया साऊथ चित्रपटांबरोबरच बॉलिवूड चित्रपटांमध्येही प्रसिद्ध आहे. अलीकडेच तमन्ना भाटिया ‘स्त्री 2’ चित्रपटात झळकली होती. स्त्री चित्रपटातील तमन्ना भाटियाच्या डान्सचे कौतुक होत असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अफलातून कमाई करत आहे.
अवघ्या सहा दिवसात ‘स्त्री 2’ ने जगभरात ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. ‘स्त्री 2’ या चित्रपटात केलेल्या मादक डान्समुळे चर्चेत आलेल्या तमन्ना भाटियाने राधा राणी बनून चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे.
कृष्ण जन्माष्टमीपूर्वी या अभिनेत्रीचे राधाराणी रूप पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये ती भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन झालेली असल्याचं पाहायला मिळतंय
तमन्ना भाटियाने काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती राधाराणीच्या रूपात अतिशय मोहक दिसत आहे.
प्रसिद्ध डिझायनर तौरानीने जन्माष्टमीपूर्वी राधा-कृष्णाच्या कथेवर त्यांचे नवीन कलेक्शन लॉन्च केले आहे.
तोराणी यांच्या संग्रहाचे शीर्षक आहे ‘लीला: द डिव्हाईन इल्युजन ऑफ लव्ह’. या फोटोशूटसाठी तमन्ना भाटियाला कास्ट करण्यात आले होते.
हेवी वर्क साडीमध्ये तमन्ना भाटिया खूपच सुंदर दिसत आहे.
गुलाबाच्या पाकळ्यांच्या पलंगावर झोपून तमन्नाने मादक फोटोशूट केलं आहे.
तमन्ना भाटिया हातात मोरपंख घेऊन दिसली.