मुंबई: जन्माष्टमीचा सोहळा २६ ऑगस्ट २०२४ला साजरा केला जात आहे. पुराणात सांगितले आहे की जेव्हा भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला अर्ध्या रात्री रोहिणी नक्षत्रात कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो.
यावेळेस जन्माष्टमीला शुभ आणि दुर्लभ योगायोग बनत आहे. जन्माष्टमीला अनेक राजयोग बनत आहेत. यामुळे अनेक राशींचे भाग्य उजळणार आहे. श्रीकृष्णाच्या आशिर्वादााने व्यापार, नोकरी आणि धनलाभ होईल. जाणून घ्या कोणत्या राशींना होणार लाभ
वृषभ रास
जन्माष्टमीला बनत असलेल्या दुर्लभ संयोगाचा लाभ वृषभ राशीच्या लोकांना अधिक होईल. नोकरी-बिझनेसची स्थिती आधीपेक्षा चांगली होईल. आव्हाने कमी होतील. जुन्या संपत्तीतून धनलाभ होईल. आर्थिक वृद्धी होईल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल.
कुंभ रास
जन्माष्टमीचा सोहळा कुंभ राशीच्या लोकांसाठी नशीबवान ठरू शकतो. मुलांना त्यांच्या क्षेत्रात यश मिळेल. धन समस्या संपतील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल.
सिंह रास
सिंह राशीसाठी जन्मानष्टमीचा सण आनंद घेऊन येईल. व्यापारात विस्तार होईल. धन वृद्धीच्या योगामुळे पैशामध्ये वाढ होईळ. करिअरमध्ये शुभ फल प्राप्ती होईळ. कमाई चांगली होईल. आरोग्याचे लाभ मिळतील.